Elec-widget

घरकुल घोटाळा प्रकरण, काँग्रेसच्या 'या' मोठ्या नेत्याला अटक

घरकुल घोटाळा प्रकरण, काँग्रेसच्या 'या' मोठ्या नेत्याला अटक

खान्देशातील जळगाव घरकुल घोटाळा नंतर आता धुळे जिल्ह्याच्या दोंडाईचा घरकुल घोटाळ्याने एका माजी मंत्र्याच्या गळ्याभोवती फास आवळला आहे.

  • Share this:

धुळे, 23 जुलै : खान्देशातील जळगाव घरकुल घोटाळा नंतर आता धुळे जिल्ह्याच्या दोंडाईचा घरकुल घोटाळ्याने एका माजी मंत्र्याच्या गळ्याभोवती फास आवळला आहे. दोंडाईचा येथील घरकुलात गैरव्यवहार केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी कामगार मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांना जिल्हा न्यायालयात ताब्यात घेऊन अटक केली आहे. डॉक्टर देशमुख अंतरिम जामीनावर होते. मात्र हा जामीन रद्द झाल्यामुळे त्यांना न्यायालयाच्या आवारातच ताब्यात घेण्यात आले.

जिल्हा न्यायालयाने डॉ देशमुख यांना तात्पुरता जामीन दिला होता तो रद्द करण्यासाठी जिल्हा न्यायालयात कामकाज सुरू होते. त्यानंतर डॉक्टर देशमुख कारवाई पुढे ढकलण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करत होते. मात्र अखेर याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव घरकुल घोटाळा प्रमाणेच राजकीय दबावाला बळी न पडता माजी मंत्री डॉक्टर देशमुख यांच्यावरती खटला चालवण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(पाहा :दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईलनं तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल)

2016 साली या गैरव्यवहार प्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दलित आदिवासी मातंग समाज मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात केलेल्या याचिकेनुसार माजी मंत्री हेमंत देशमुख, 3 तत्कालीन माजी नगराध्यक्ष डॉ रवींद्र देशमुख, विक्रम पाटील, गुलाबसिंग सोनवणे, 3 तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, अमोल बागुल, राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास झाल्यानंतर माजी नगरसेवक गिरीधारी रामराख्या यांच्या खात्यात योजनेच्या ठेकेदाराने जवळपास 15 कोटींचा व्यवहार केला होता

(पाहा :बेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या)

Loading...

घरकुल योजना राबविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हाय पॉवर कमिटीचे हे सदस्य होते म्हणून त्यांना देखील आरोपी करून जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली  तेव्हापासून त्यांना कोर्टाने अद्याप जामीन दिलेला नाही , याशिवाय योजनेचे ठेकेदार संतोष जयस्वाल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख असे एकूण 10 आरोपी करण्यात आले गिरीधारी रामराख्या यांच्यानंतर माजी मंत्री हेमंत देशमुख यांना अटक झाली असून 3 नगराध्यक्ष , 3 मुख्याधिकारी, ठेकेदार आणि नाजीम शेख हे तात्पुरता जामीनावर आहेत

(पाहा :SPECIAL REOPRT: गुन्हेगारांसोबत आता नागपूर पोलिसांवर डुक्कर पकडण्याची वेळ)

दोंडाईचा घरकुल घोटाळा काय आहे प्रकरण ?

दोंडाईचा शहरात 77 कोटींची घरकुल योजना राबवून देखील त्याचे नित्कृष्ठ दर्जाचे काम करणे, एवढा शासनाचा पैसा खर्च करून योजनेतील निधीच्या पैशाने बांधकाम झालेली शाळा स्वतः च्या ज्ञानोपासक शिक्षण सस्थेच्या शाळेला विनामूल्य देने, योजनेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या कत्तलखानाला आपल्या हस्तकच्या कंपनीला नाममात्र भाड्याने देणे, याशिवाय घरकुल योजना राबवताना जी खासगी जागेवर राबवणे, असे विविध आरोप माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्यावर आहेत.

सोमवारी (22 जुलै )न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कामकाज होऊन त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले संशयित गिरधारी रामराख्या यांच्या जामीन अर्जावर २८ जुलै रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सुनावणी होणार आहे.

VIDEO: चंद्रकांत पाटलांनी 'हा' बालिशपणा सोडून द्यावा; धनंजय मुंडेंचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...