धुळे महापालिका: गोटेंचा विजय अवघड, लोकसंग्रामच्या खात्यात एकच जागा

लोकसंग्रामचे नेते आणि भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे हे मोठ्या ताकदीने पालिका निवडणुकांच्या मैदानात उतरले खरे पण अद्याप फक्त एकच जागा ही लोकसंग्रामच्या खात्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 11:17 AM IST

धुळे महापालिका: गोटेंचा विजय अवघड, लोकसंग्रामच्या खात्यात एकच जागा

धुळे, 10 डिसेंबर : लोकसंग्रामचे नेते आणि भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे हे मोठ्या ताकदीने पालिका निवडणुकांच्या मैदानात उतरले खरे पण अद्याप फक्त एकच जागा ही लोकसंग्रामच्या खात्यात आली आहे. त्यामुळे आता गोटेंचा प्रवास कुठेतरी खडतर होताना दिसत आहे. तर अनिल गोटे यांची पत्नी धुळ्यातून आघाडीवर आहे आणि भाजप 21 जागांवर आहे.

बंडखोर भाजप आमदार अनिल गोटे यांची पत्नी आणि मुलगादेखील धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. अनिल गोटे यांच्या पत्नी या लोकसंग्राम पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवारही आहेत. त्यामुळे अनिल गोटे हे भाजपमधून बंडखोरी केल्यानंतर यश मिळवतात का, याची उत्सुकता आहे.

धुळे महानगरपालिकेच्या 73 जागांसाठी रविवारी मतदान झालं. थोड्याच वेळात या सर्व जागांचे निकाल जाहीर होतील. भाजप आमदार अनिल गोटे यांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक राज्यभर गाजली आहे. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी, अनिल गोटेंचा लोकसंग्राम पक्ष आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

धुळे महानगरपालिकेत एकूण 74 जागा असून त्यातील 1 जागा बिनविरोध झाल्याने उर्वरीत 73 जागांसाठी मतदान घेण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

Loading...

ही जरी स्थानिक निवडणूक असली तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, पक्षात उठलेलं वादळ आणि मुख्यमंत्र्यांची सभा यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली आहे.

मागील निवडणुकीत कुणाला किती जागा मिळाल्या?

राष्ट्रवादी - 34

शिवसेना - 11

काँग्रेस - 7

भाजप - 3

समाजवादी पार्टी - 3

लोकसंग्राम - 1

बसप- 1

अपक्ष - 10


आठवले यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला बेदम चोप, पहिला VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...