नगरमध्ये निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

नगरमध्ये निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: महानगरपालिकेच्या या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी गेले होते. तर दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकांची जबाबदारी स्थानिक नेत्यांकडे दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

  • Share this:

मुंबई, 9 डिसेंबर : अहमदनगर महानगरपालिका  निवडणुकीच्या ड्युटीवर असताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अशोक सुर्यवंशी असं या मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. अशोक सुर्यवंशी हे बांधकाम विभागातील कर्मचारी असल्याची माहिती आहे. सावेडी प्रभागाच्या मतदान केंद्रावर प्रकृती बरी नसल्याने सुर्यवंशी झोपले होते. झोपेतच या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निवडणुकीसाठी तैनात असताना कर्माचाऱ्याचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

धुळे आणि अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी 7:30 पासून मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झालं. धुळे महानगरपालिकेत 1 जागा बिनविरोध झाली असून इतर 73 जागांसाठी मतदान होत आहे. भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी लोकसंग्रामच्या तिकिटावर स्वतंत्र उमेदवार उभे करून स्वपक्षाला आव्हान दिलंय. याचा भाजपला फटका बसतो का, हे पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2018 07:37 AM IST

ताज्या बातम्या