महेश म्हात्रे यांच्या हस्ते धर्मपाल कांबळे यांच्या पुस्तकांचं प्रकाशन

शोध अण्णा भाऊ साठेंच्या घराचा' हे संशोधनपर पुस्तक लिहिलंय. या पुस्तकांचं प्रकाशन आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांच्या हस्ते पार पडलं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2017 10:46 PM IST

महेश म्हात्रे यांच्या हस्ते धर्मपाल कांबळे यांच्या पुस्तकांचं प्रकाशन

हलीमा कुरेशी, पुणे

26 जुलै : पुण्यात लेखक धर्मपाल कांबळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित 'मृत्यूकडून जीवनाकडे'  या पुस्तकाचं संकलन केलंय. त्याचप्रमाणे 'शोध अण्णा भाऊ साठेंच्या घराचा'  हे संशोधनपर पुस्तक लिहिलंय. या पुस्तकांचं प्रकाशन आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांच्या हस्ते पार पडलं.

पेशाने 'पोस्टमन ' असलेल्या लेखक धर्मपाल कांबळे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा शोध घेतलाय. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून अण्णाभाऊ साठेंना दिलेला बंगला काही व्यक्तींकडून  हडपला गेल्याचा आरोप लेखक धर्मपाल कांबळे यांनी या पुस्तकातून केलाय.

राज्य सरकारने अण्णा भाऊ साठे यांच्या घरासंबंधी सखोल चौकशी करावी अशी भावना आयबीएन लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2017 10:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...