बीडमध्ये पुन्हा मुंडे विरूद्ध मुंडे

आता ग्रामपंचायत निवडणुकीतही मुंडे विरूद्ध मुंडे हा सामना बघायला मिळणार आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 6, 2017 11:42 AM IST

बीडमध्ये पुन्हा मुंडे विरूद्ध मुंडे

बीड,06 सप्टेंबर: नगर परिषद, जिल्हा परिषद या दोन्ही निवडणुकीत  मंत्री पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडेंकडून जबरदस्त हार पत्करावी लागली. आता ग्रामपंचायत निवडणुकीतही मुंडे विरूद्ध मुंडे हा सामना बघायला मिळणार आहे.

बीड जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये परळी मतदार संघात ७१ ग्राम पंचायतीच्या निवडणूका होत आहेत. सरपंचांची थेट जनतेतून निवड होतं असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा सरपंच व्हावा याकरता धनंजय मुंडे गाव निहाय मोट बांधणी करत आहेत. 'राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत महायुतीमधून आता एक एक पक्ष बाहेर पडत असून ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत मतदार हे सरकार विरोधी आपला रोष नक्की व्यक्त करतील' असा विश्वास या वेळी आयबीएन लोकमतशी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2017 10:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close