ईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...

'भारताच्या ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतात आणि झाल्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक झाल्याची माहिती मुंडे यांना होती'

News18 Lokmat | Updated On: Jan 21, 2019 11:03 PM IST

ईव्हीएममुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, धनंजय मुंडे म्हणतात...

21 जानेवारी : अमेरिकन हॅकर सय्यद शुजा याने भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल गंभीर खुलासा केला आहे. याबद्दल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडे म्हणतात, 'भारताच्या ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतात आणि झाल्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक झाल्याची माहिती मुंडे यांना होती. गोपीनाथ मुंडे यांचा घातपात नसून तो घात झाला हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.'

'याआधीही काही लोकांनी संशय व्यक्त केला होता. अपघातानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक जणांनी माझ्यासह ही शक्यता बोलून दाखवली होती', असंही मुंडे म्हणाले.

गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येबद्दल अमेरिकेच्या हॅकरचा दावा

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केली असा गंभीर आरोप अमेरिकेच्या एका हॅकरने केला आहे. तसंच ईव्हीएम हॅकिंगबद्दल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना माहिती होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाली असा खळबळजनक खुलासा सय्यद शुजा या हॅकरने केला आहे. लंडनमध्ये त्याने गुप्तपणे काॅन्फरर्सद्वारे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने भारतात ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते, असा दावा केला आहे. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांना याबद्दल माहिती होते. त्यामुळे दिल्लीत कार अपघातात त्यांची हत्या करण्यात आली होती, असा दावाही त्याने केला.

Loading...

सय्यद शुजाने अनेक खळबळजनक दावे केले आहे. 2014 ची लोकसभेची निवडणूक ही फिक्स होती, असा आरोपही त्याने केला. तसंच 'माझ्याकडे यासंदर्भात पुरावे आहे आणि मी ते दाखवू शकतो', असा दावाही त्याने केला.

'दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही ईव्हीएम घोळ होणार होता. तेव्हा भाजपच्या आयटी सेलकडून ट्रांसमिशन सापडले होते. त्यामुळे ते वेळीच रोखता आले. दिल्लीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. आपने 70 पैकी 67 जागा जिंकल्यात', असा दावाही त्याने केला.

अलीकडेच झालेल्या राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकही भाजप जिंकली असती. परंतु, आमच्या टीमने या राज्यात भाजपकडून ट्रांसमिशन हॅक करण्याचा डाव हाणून पाडला, असा दावाही त्याने केला.

ईव्हीम मशीन तयार करणाऱ्या टीममध्ये आपण होतो. त्यामुळे ही मशीन कशी हॅक करायची हे मला माहिती आहे. निवडणूक आयोगाने सांगितल्यास त्यांना दाखवू शकतो, असं आव्हानच त्याने दिलं.

काही दिवसांपूर्वीच शुजा आणि त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यामुळे त्याने आज लंडनमध्ये गुप्तपणे व्हिडिओ काॅन्फरर्सद्वारे पत्रकार परिषद घेतली. शुजा हा आधी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा कर्मचारी होता. त्याने 2009 ते 2014 च्या काळात काम केले.

परंतु, निवडणूक आयोगाने शुजाचा दावा खोडून काढला आहे. त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन (युरोप)कडून ईव्हीएम हॅकथॉनचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हजर आहे.

याप्रकरणी भाजपने आपली भूमिका मांडली आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या प्रकरणी काँग्रेसवर टीका केली आहे. 'काँग्रेसचे अनेक अशी माणसं आहे, जी मोदींना हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ते यासाठी पाकिस्तानात सुद्धा जातात. आगामी निवडणुकीत ते आपल्या पराभवाबद्दल हॅकिंग हाॅरर शो तयार करत आहे', अशी टीका केली आहे.

'कपिल सिब्बल तिथे काय करत आहे. त्यांना राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी पाठवले आहे. त्यांनी भारतीय लोकशाहीला बदनाम करण्यासाठी सुपारी घेतली आहे, त्यासाठी त्यांना पाठवले', अशी टीकाही नक्वी यांनी केली.

====================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 11:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...