News18 Lokmat

...तर मुख्यमंत्री महोदय तुम्ही तुमच्या चड्डीत राहा, धनंजय मुंडेंनी दिली तंबी

'देवेंद्र फडणवीस तुमची हाफ चड्डी आता फुल झाली म्हणजे तुम्हाला खूप शहाणपण आलं असं होत नाही. एक सांगतो, वारंवार तुम्ही पवार साहेबांवर टीका करत असाल तर मुख्यमंत्री महोदय तुम्ही तुमच्या चड्डीत राहा,' अशी तंबी देत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 05:22 PM IST

...तर मुख्यमंत्री महोदय तुम्ही तुमच्या चड्डीत राहा, धनंजय मुंडेंनी दिली तंबी

रायचंद शिंदे (प्रतिनिधी)

शिरूर, 23 एप्रिल- 'देवेंद्र फडणवीस तुमची हाफ चड्डी आता फुल झाली म्हणजे तुम्हाला खूप शहाणपण आलं असं होत नाही. एक सांगतो, वारंवार तुम्ही पवार साहेबांवर टीका करत असाल तर मुख्यमंत्री महोदय तुम्ही तुमच्या चड्डीत राहा,' अशी तंबी देत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.

शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ तळेगाव ढमढेरे येथे धनंजय मुंडे यांची विजय संकल्प सभा पार पडली.  यावेळी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना मुंडे यांची जीभ घसरली. मुंडे यांनी अतिशय खालच्या भाषेत मुख्यमंत्र्यांवर हल्लेबोल केला. तुम्हाला स्मृती इराणी चालते, हेमामालिनी चालते मग आमचा अमोल कोल्हे का नाही चालत? असा सवाल मुंडे यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या काल झालेल्या शिक्रापूर येथील सभेला दोनशे रुपये रोजाने भाड्याने माणसं आणावी लागली, सभेला माणसं जमंत नाही, अशी यांची अवस्था असल्याचे  सांगत मोदींवरही टीका केली.

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सटाण्यात राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या 25 मिनिटांच्या भाषणात शौचालय, घरकूल, जनधन, पुलवामा, आदी मुद्द्यांचा जास्त उल्लेख केला नाही. राज ठाकरे तसेच दुष्काळी परिस्थितीचा भाषणात कुठेही उल्लेख केला नाही.


Loading...

VIDEO : गौरीचं नाव घेतो पुन्हा येणार राष्ट्रवादी सरकार, नवरदेवाचा उखाणा व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 05:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...