Elec-widget

धनगर आरक्षणाची कागदपत्र गायब, सरकारी वकिलांची धक्कादायक माहिती

धनगर आरक्षणाची कागदपत्र गायब, सरकारी वकिलांची धक्कादायक माहिती

निवडणुकीच्या तोंडावर कागदपत्र गायब झाल्याचं स्पष्ट झाल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई 12 मार्च  : धनगर आरक्षणाची कागदपत्रे उच्च न्यायालयातून गायब झाल्याची धक्कादायक माहिती आज सरकारी वकिलांनी न्यायालया दिल्याने खळबळ उडालीय. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र सकारी वकिलांनी ही माहिती दिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. धनगर आरक्षण हा संवेदनशील मुद्दा आहे. निवडणुकीच्या तोंडावर कागदपत्र गायब झाल्याचं स्पष्ट झाल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

2014 च्या निवडणुकीच्या प्रचारात बारामतीत झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मराठा आंदोलन पेटलं आणि मराठ्यांना आरक्षणही मिळालं. मात्र धनगर आरक्षणाचा प्रश्न अजुन सुटलेला नाही. त्यामुळे धनगर समाज नाराज आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करणं हे केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने त्याला उशीर लागतोय असा दावा करण्यात येतोय. यावर अनेकदा आश्वासनं देण्यात आली आहेत.

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

डिसेंबरनंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. नागपुरातल्या धनगर आरक्षण निर्णायक परिषदेत ते बोलत होते. धनगर आरक्षणाचा टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल येत्या डिसेंबर महिन्यात मिळेल. त्या अहवालाच्या आधारे केंद्राकडं आरक्षणासाठी पाठपुरावा केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र प्रकरण पुढे सरकले नाही.

मंत्रालयात पाय ठेवणार नाही

Loading...

'जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळनार नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही' असं जाहीर वक्तव्य  ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. नांडेद जिल्ह्यातील माळेगाव इथं सध्या खंडोबाची यात्रा सुरू आहे.  यावेळी आयोजीत धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राफेल प्रकरणावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यालयात असाच प्रकार घडला होता. संरक्षण मंत्रालयातून राफेल संदर्भातील फाईल चोरी केल्याचं त्यावेळी सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आलं होतं. या प्रकरणावरुन केंद्र सरकारची मोठी नाचक्की झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...