धनगर आरक्षणाचा निर्णय डिसेंबरनंतर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

धनगर आरक्षणाचा निर्णय डिसेंबरनंतर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

डिसेंबरनंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. नागपुरातल्या धनगर आरक्षण निर्णायक परिषदेत ते बोलत होते.

  • Share this:

05 नोव्हेंबर : डिसेंबरनंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. नागपुरातल्या धनगर आरक्षण निर्णायक परिषदेत ते बोलत होते. धनगर आरक्षणाचा टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल येत्या डिसेंबर महिन्यात मिळेल. त्या अहवालाच्या आधारे केंद्राकडं आरक्षणासाठी पाठपुरावा केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देणार असल्याचीही घोषणा केली. मागच्या सरकारनं धनगर आरक्षणाच्या नावाखाली समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मुख्यमंत्री ज्यावेळी व्यासपीठावर भाषणासाठी उभे राहिले त्यावेळी त्यांना 'क्या हुवा तेरा वादा' हे गाणं ऐकवून आयोजकांनी आरक्षणाची आठवण करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2017 06:06 PM IST

ताज्या बातम्या