Elec-widget

आदिवासी वर्गात आरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाज आक्रमक

आदिवासी वर्गात आरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाज आक्रमक

आंदोलकांनी पुण्यातल्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाची तोडफोड केली

  • Share this:

पुणे, २५ ऑगस्ट- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या हिंसक आंदोलनाची झळ महाराष्ट्रानं सोसली. आता आदिवासी वर्गात आरक्षण मिळावं म्हणून धनगर समाजदेखील आक्रमक झालाय. शुक्रवारी पुण्यात काढलेल्या मोर्चाला अचानक हिंसक वळण मिळालं. आंदोलकांनी पुण्यातल्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी आंदोलकांनी कार्यालयात भंडारा उधळला आणि कार्यालयातल्या सामानाची तोडफोड केली. पुण्याशिवाय अहमदनगर, सातारा आणि सोलापूरमध्येदेखील धनगर समाजानं मोर्चा काढला.

धनगल समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यात धनगर बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. नगर शहरातून मोटार सायकल रॅली काढून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनदेखील करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने धनगर बांधव आपल्या शेळ्या मेंढ्यांसह सहभागी झाले होते.

भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही हे आरक्षण न दिल्याने सरकारने धनगरांची फसवणून केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. एवढेच नाही तर सरकारने दिलेला शब्द नाही पाळला आणि आरक्षण नाही दिले तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा यावेळी देण्यात आला.

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी साताऱ्यातील सैनिक स्कुलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातून हजारो धनगर बांधव सहभागी झाले होते. ढोलताशाच्या गजरात पारंपरिक धनगरांच्या गजी नृत्यानं मोर्चाला सुरुवात झाली. धनगड या शब्दाचा धनगर असा उल्लेख करुन धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील लिहिलेल्या अनुसुचित जमाती मधील ३४२ कलमानुसार धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश केला असताना या समाजाचा धनगड असा उल्लेख केल्यामुळे धनगर समाज या आरक्षणापासून आजही वंचित राहिला. यामुळे तात्काळ धनगड या शब्दाचा धनगर असा उल्लेख करुन धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी वेगवेगळ्या मोर्चांमधून होत आहे.

Loading...

VIDEO : पुरात टँकर गेला वाहून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2018 01:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...