महाराष्ट्रात आघाडीचाच मुख्यमंत्री होणार, धनंजय मुंडेंना विश्वास

महाराष्ट्रात आघाडीचाच मुख्यमंत्री होणार, धनंजय मुंडेंना विश्वास

भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन कलगीतुरा रंगत आहे. याबाबत भाष्य करताना धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जून : 'विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपचा किंवा शिवसेनेचा नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मुख्यमंत्री होणार,' असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन कलगीतुरा रंगत आहे. याबाबत भाष्य करताना धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केलं आहे.

मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी सरकारवर चौफेर टीका केली. 'भाजपच्या कालच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता. हे विस्मरण कसं झालं?शिवाजी महाराज स्मारकाची अजून एक वीटही रचली गेली नाही. आता शिवशाही सरकार आणू म्हणतात. पण भाजपने त्यांचा अपमान केला आहे,' असं म्हणत शिवस्मारकावरून धनंजय मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

'पीक विमा कंपन्यांची ऑफिस गेली पाच वर्षे मुंबईत आहेत. हे पाच वर्षांनी उद्धव ठाकरे यांना आता कळालं का? पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा दिला नाही. मतांची गरज आहे म्हणून आता शेतकरी आठवला का? पाऊस पडायला लागला तेव्हा दुष्काळ दौऱ्यावर तुम्ही निघणार आहात. उन्हाळ्यात शेतकरी होरपळत असताना तुम्ही विदेश दौऱ्यावर गेला होता,' असं म्हणत धनंजय मुंडेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मुंबईतील बैठकीत का झाला राडा?

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. या सगळ्या राड्यामुळे काही काळ राष्ट्रवादीच्या मुख्यालयाबाहेर तणावाचं वातावरण तयार झालं होतं.

लोकसभेतील पराभवावर चिंतन करण्यासाठी राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. बैठीकवेळी परभणी मतदारसंघातील गंगाखेडच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि नंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यावर धनंजय मुंडे यांनी भाष्य केलं आहे. 'सोशल मीडियावर पोस्ट टाकली यातून दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. हा काही नेत्यांचा किंवा पक्षातील वाद नाही,' असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

अशी आहे जगदगुरू तुकोबारायांच्या पालखीची परंपरा, पाहा EXCLUSIVE रिपोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2019 03:36 PM IST

ताज्या बातम्या