News18 Lokmat

शेतकऱ्यांसाठी धनंजय मुंडे आक्रमक, सरकारकडे केली 'ही' मागणी

उन्हाळी मशागतीची कामं करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता आहे. मात्र विमाधारक शेतक-यांना नुकसाना भरपाई मिळाली नसल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 08:44 PM IST

शेतकऱ्यांसाठी धनंजय मुंडे आक्रमक, सरकारकडे केली 'ही' मागणी

बीड, 21 मे : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. बीड जिल्ह्यातील सुमारे 12 लाख शेतकरी पिकविमा नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. तात्काळ पिकविमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप करा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

उन्हाळी मशागतीची कामं करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता आहे. मात्र विमाधारक शेतक-यांना नुकसाना भरपाई मिळाली नसल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषी संचालक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांच्यासह आदींकडे याबाबत त्यांनी लेखी मागणी केली आहे.

हेही वाचा : ...म्हणून लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार उशिरा

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिकविमा नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वाटप करण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे. खरीप 2018 च्या हंगामाकरीता बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे हप्त्याची रक्कम भरणा केलेली आहे.

सोयाबीन व्यतिरिक्त इतर पिकांचा विमा बँकेकडे वर्ग झालेला आहे. मात्र, शासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पिकविम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. बीड जिल्ह्यात सुमारे 12 लाख शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी विमा हप्ता भरला होता.

Loading...

विमाधारक शेतकऱ्यांना सुमारे 800 ते 900 कोटी रुपये पिक नुकसान भरपाई मिळणं आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची संपूर्ण पिकं वाया गेलेली असतानाही शासन आणि संबंधित विभागाचे मंत्री याबाबत बोलत नाहीत. पिकविमा कंपन्यांकडून सातत्याने नफेखोरी केली जात असल्याची टिकाही वेळोवेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

हेही वाचा : TikTok स्टारची हत्या, व्हिडिओ शूट करताना झाडल्या गोळ्या

पेरणीपूर्वी उन्हाळी मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. शेतकऱ्यांना सध्या पैशांची नितांत आवश्यकता आहे. शासनाने केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. अशा परिस्थितीत किमान ज्या शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना पिकविमा नुकसान भरपाईची रक्कम वेळेत मिळाली पाहिजे अशी आग्रही भुमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.

पुढील 7 दिवसांत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ पिकविमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला आहे. सोयाबीन उत्पादकांच्या पिकविमा नुकसान भरपाईच्या प्रश्‍नावर धनंजय मुंडे यांनी आवाज उठविल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.

SPECIAL REPORT : मोदींची त्सुनामी, सट्टा बाजारात आला भूकंप!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2019 08:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...