मंत्री असूनही पंकजा मुंडेंनीच उद्योग बंद पाडले - धनंजय मुंडे

मंत्री असूनही पंकजा मुंडेंनीच उद्योग बंद पाडले - धनंजय मुंडे

'महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच मंत्र्यांनी आपल्या भागात कोणते ना कोणते प्रकल्प उद्योग उभे केलेत परंतु पाच वर्षात बीड मध्ये एकही प्रकल्प आला नाही.'

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 28 जुलै : पंकजा मुंडे या मंत्री असूनही त्यांना आपल्या भागात उद्योग आणला आले नाहीत. उलट जे उद्योग होते ते बंद पाडण्याचं काम झालं अशी घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलीय. राज्याच्या सत्तेवर विरोधी पक्ष नेता म्हणून मी अंकुश ठेवला असंही त्यांनी सांगितलं. मात्र उद्योग आणणे ही जबाबदारी सत्तेतील मंत्र्यांची आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळूनही या भागाचे कल्याण त्यांना करता आलं नाही, हे कोणाचे अपयश आहे अशी टीकाही त्यांनी केली.

प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीवर टांगती तलवार? काँग्रेसच्याच नगरसेवकाचा विरोध

महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच मंत्र्यांनी आपल्या भागात कोणते ना कोणते प्रकल्प उद्योग उभे केलेत परंतु पाच वर्षात बीड मध्ये एकही प्रकल्प आणला नाही उलट आपल्या भागातील चालू उधोग बंद पडत आहेत अशी टीकाही त्यांनी केली. ते परळीत सुशिक्षित बेरोजगारासाठी आयोजित रोजगार मेळाव्या बोलत होते.

धनंजय मुंडे म्हणाले, ज्या थर्मल पॉवर स्टेशनच्या राखेच्या जीवावर परळीत सिमेंटची फॅक्टरी उभी राहिली तेच थर्मल पॉवर स्टेशन आज बंद आहे. मला पुन्हा संधी मिळाली तर तो प्रकल्पही लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितंलं.

मुंबई पोलीस देताहेत आता 'डांसबार'मध्ये पहारा

Loading...

या रोजगार मेळाव्यात अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळालीय. इयत्ता दहावी ते पदवीधारक सुशिक्षित बेरोजगारांना पुणे मुंबई सारख्या महानगरात जाऊन नोकरीसाठी कंपन्यांचे हेलपाटे मारावे लागतात परंतु महाराष्ट्रातील नामवंत 40 खाजगी कंपन्यांचे पॅनल प्रत्यक्ष परळी मध्ये येऊन नोकरीसाठी कागदपत्र पडताळणी, कॅम्पस् मुलाखती घेण्यासाठी आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...