महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झालीय-धनंजय मुंडे

महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झालीय-धनंजय मुंडे

गुजरातमध्ये जसा विकास वेडा झालाय तशी महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झाल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलीय

  • Share this:

नागपूर, 10 डिसेंबर: महाराष्ट्रात पारदर्शकतता वेडी झालीय अशी टीका राज्य सरकारच्या कारभारावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.  ते हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलत होते.

गुजरातमध्ये जसा विकास वेडा झालाय तशी महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झाल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलीय. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली या बैठकीनंतरच्या पेत्रकार परिषदेत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला.

बीटी बियाणांच्या मुद्यावर बोलताना विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सरकारला चिमटे काढले. बी म्हणजे भाजप आणि टी म्हणजे ठाकरे असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकारनं चाळीस लाख शेतकऱ्यांची नावं वेबसाईटवर टाकावी अशी मागणीही त्यांनी केलीये.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय.सरकारच्या विरोधात एक मोहिमसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने यवतमाळपासून नागपूरपर्यंत काढली होती.

त्यामुळे आता उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधक सरकारला घेरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 04:43 PM IST

ताज्या बातम्या