मुंडे साहेबांचं स्वप्न आमच्या बहिणबाईला कळत नाही - धनंजय मुंडे

'5 वर्षात बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख हा कलंक या वारसाला पूसता आला नाही' असंही ते पंकजा मुंडे यांना उद्देशून म्हणाले.

News18 Lokmat | Updated On: Mar 16, 2019 08:40 PM IST

मुंडे साहेबांचं स्वप्न आमच्या बहिणबाईला कळत नाही - धनंजय मुंडे

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 16 मार्च : 'ऊसतोड मंजुरीचा जिल्ह्य़ाचा कलंक पुसून काढायचा हे खऱ्या अर्थानं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं. पण तेच आमच्या बहिणाबाईला कळत नाही' अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर केली आहे. '5 वर्षात बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख हा कलंक या वारसाला पूसता आला नाही' असंही ते पंकजा मुंडे यांना उद्देशून म्हणाले.

बीडमध्ये बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेवर जोरदार टीका केली. 'खंत या गोष्टीची वाटते की वडिलांच्या नावाने ऊसतोड मजुरांचे महामंडळ या सरकारने काढण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात महामंडळ अजूनही नाही आहे. माझ्यासारखा असतात तर सरकार हलवून काढल असतं. पण ज्यांच्या नावानं राजकरण करता त्या ऊसतोड मजुरांच महामंडळ होत नसेल तर माझ्या सारख्यानं सरकारला लाथ मारून बाहेर पडलो असतो. पण आमच्या बहिणाबाई चिटकून बसल्या आहेत' असं म्हणत धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार फटकेबाजी केली आहे.

कशाच्या दबंग खासदार...? धनंजय मुंडेंचा सवाल

ते पुढे म्हणाले की, 'स्वर्गीय मुंडे साहेबांच्या कन्या म्हणून विक्रमी मतांनी निवडून आल्या. मात्र 5 वर्षात निधी खर्च करताना बीडच्या खासदारांचा उच्चांक खालून आहे. 1200 गावापैकी 800 गावालाही बीडच्या खासदारांनी निधी दिला नाही. मग कसले दबंग खासदार आम्ही' असंही धनंजय मुंडे म्हणाले.

Loading...

गल्ली ते दिल्लीपर्यंतच तुमची ताकद आहे. तर माझा दोन्ही बहिणींना प्रश्न आहे असं म्हणतं धनंजय मुंडे यांनी त्यांना प्रश्न विचारला आहे. 'रेल्वेचे डबे बनवण्यासाठी 10 कोटी रुपयांचा प्रकल्प लातूरला का गेला बीडला का नाही?'

'आम्ही सर्व एक जिवाने निवडून आणण्यासाठी कामाला लागलो आहे. हे 23 मे रोजी जनता दाखवून देईल. राष्ट्रवादीचा उमेदवारच विजयी होणार आहे. शेतकरी असाल शेतकऱ्यांच्या संवेदना असतील तर शेतकऱ्यांच्या पोराला निवडणून द्या' असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

पाटोदा येथील तालुका बूथ कमिटी सदस्य आणि कार्यकर्ता मेळाव्यात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री प्रकाश सोंळके, माजी आमदार अमरसिह पंडित, सय्यद सलीम, बाळासाहेब आजबे, सतिष शिंदे, जिल्हाअध्यक्ष तथा लोकसभा उमेद्वार बजरंग सोनवणे आदी उपस्थित होते.

VIDEO : अजित पवारांची सुजय विखेंवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 08:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...