जलयुक्त शिवार योजना फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी - धनंजय मुंडे

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करू, टँकरमुक्त करू, लोडशेडिंग मुक्त करू, टोलमुक्त करू असं भाजप सरकारने म्हटलं होतं पण यापैकी कुठलाही शब्द ४ वर्षात सरकारनं पूर्ण केला नाही असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2018 07:26 PM IST

जलयुक्त शिवार योजना फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी - धनंजय मुंडे

मुंबई, 29 ऑक्टोबर : भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करू, टँकरमुक्त करू, लोडशेडिंग मुक्त करू, टोलमुक्त करू असं भाजप सरकारने म्हटलं होतं पण यापैकी कुठलाही शब्द ४ वर्षात सरकारनं पूर्ण केला नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते आज मुंबईत आयोजित न्यूज18 लोकमच्या 'रायझिंग महाराष्ट्र' या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

मागील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आठवते आहे. त्यावेळी भाजपच्या अध्यक्षांनी भ्रष्टाचार मुक्त, टोलमुक्त, टँकरमुक्त, लोडशेडिंग मुक्त करू अशी अनेक आश्वासनं दिली होती पण चार वर्षात एकही पूर्ण झालं नाही, असं म्हणत त्यांनी सरकारच्या कामाचा उलटा पाढा वाचला आहे.

72 सालापेक्षाही भीषण दुष्काळ पडणार आहे. पण  दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. त्यामुळे दुष्काळाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी मी उभा आहे. दुष्काळाला सामोरं जात असताना सरकारला अडचणी दिसत असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

भाजपच्या मंत्र्यानी दुष्काळ शोधण्यासाठी चक्क मोदी सॅटेलाईट शोधून काढलं. जलयुक्त शिवार योजना फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी होती, महाराष्ट्राच्या उपयोगाची नव्हती. आम्ही मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पुरावे सादर केले, पण त्यांना फक्त क्लीनचिट देण्यात आली असा आरोपही मुंडेनी या कार्यक्रमात बोलताना केला.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा चार वर्षांचा दोनदा संप का झाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ग्रामसेवक, संगणक चालक तर सर्वच स्तरातील अधिकाऱ्यांनी संप केला असंही मुंडे म्हणाले आहेत. सरकारची कर्जमाफी योजना फसवी असून शेतकऱ्यांना कोणताही फायदा झाला नाही. शेतकरी संपावर गेल्यावर कर्जमाफीची घोषणा आठवली. पण ती ऑनलाईनमध्ये कर्जमाफी पुन्हा अडकली. त्यामुळे  सरकारने महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Loading...

VIDEO:जलयुक्त शिवाराच्या नावाखाली सरकार पाठ थोपटवून घेतंय -धनंजय मुंडे

दरम्यान, आज18 नेटवर्कची 'रायझिंग महाराष्ट्र 2018 समिट ' आज  (29 आॅक्टोबर)ला पार पडतोय. यात राज्यातले महत्त्वाचे नेते, मान्यवर, वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात भविष्यातील महाराष्ट्राच्या रोडमॅपवर चर्चा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या समिटमध्ये विशेष उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाबद्दल त्यांच्या योजना आणि दृष्टिकोन ते आपल्या भाषणातून मांडतील. मंत्रिमंडळातले वरिष्ठ सदस्य चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, ​सुभाष देसाई यांच्यासह धनंजय मुंडे, हर्षवर्धन पाटील, शेकापचे जयंत पाटील, भाई जगताप यांच्यासारखे विरोधी पक्षांचे नेते या परिषदेत भाग घेतायत.

आयटीसी ग्रँड सेंट्र्ल, परेलमध्ये ही समिट पार पडत आहे. न्यूज18 नेटवर्कच्या 'रायझिंग' मालिकेतल्या या समिटला आतापर्यंत अनेक राज्यांत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तिथे त्या-त्या राज्यांचा रोडमॅप निश्चित करण्यासाठी संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि धोरणकर्त्यांनी सखोल चर्चा केली. आता ही समिट महाराष्ट्रात होणार आहे. आणि मान्यवरांच्या सहभागानं ती निश्चितच पुढचा टप्पा गाठेल.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2018 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...