बीडमध्येही राष्ट्रवादीत बंडखोरीची लागण, धनंजय मुंडेंवर नेते नाराज

बीड जिल्ह्यातल्या तीनही दिग्गजांची नाराजी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर असल्याने धनंजय मुंडेंना लोकसभेत आपला करिष्मा दाखवणं हे आव्हान ठरणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 02:57 PM IST

बीडमध्येही राष्ट्रवादीत बंडखोरीची लागण, धनंजय मुंडेंवर नेते नाराज

सुरेश जाधव बीड19 मार्च : लोकसभेच्या निवडणुकांना आता काही दिवस राहिलेले असताना मुख्य विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी उफाळून आली आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातल्या राजकीय विरोधामुळे हा जिल्हा कायम चर्चेत असतो. पंकजा मुंडे यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी धनंजय मुंडे कायम प्रयत्न करत असतात मात्र आता या जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या नाराजीमुळे धनंजय मुंडे यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

बीड राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि माजी मंत्री आ.जयदत्त क्षीरसागर,  मुंदडा कुटुंबीय आणि पंडित घराण्यातून नाराजीचा सुर निघू लागल्याने राष्ट्रवादीच चिंतेचं वातावरण आहे. गेल्या दोन वर्षांपासून घुसमट होत असल्याने बीड मधील राष्ट्रवादीचे एकमेव विद्यमान आमदार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षातल्या गटबाजीला विरोधाला  कंटाळून भाजपशी जवळीक वाढवली आहे. धनंजय मुंडे हे आपल्याला डावलत असल्याची जयदत्त क्षीरसागर यांची भावना आहे.

अमरसिंह पंडितांच तिकीट कापलं

दुसरीकडे गेवराई मधील राष्ट्रवादीचे आमदार आमदार अमरसिंह पंडित हे बीडमधून लोकसभेसाठी इच्छुक होते. पक्षाने त्यांना तयारीला लागा असा निरोपही दिला होता. मात्र ऐनवेळी तिकीट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना दिल्याने पंडित नाराज आहेत. सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे विश्वासू आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही गेवराईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची साधी बैठकही झालेली नाही. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याने त्यांची समजुत कशी काढायची असा प्रश्न पंडितांना पडला आहे.

मुंदडा कुटुंबीय नाराज

Loading...

राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचं होमपीच असलेल्या केज विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या दिवंगत नेत्या आणि माजी मंत्री विमलताई मुंदडा यांचे कुटुंबीयही नाराज आहेत. सोनावणे आणि विमलाताईंचे मतभेद होते. विमलताई असताना ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांचाच प्रचार कसा करायचा असा सवाल करत मुंदडा कुटुंबीयांनीही प्रचारातून अंग काढून घेतलंय. पक्षश्रेष्ठींनी केज मतदार संघाची पूर्णपणे जबाबदारी देण्याचा शब्द पाळला नसल्याने मुंदडा नाराज आहेत.

आधीच गटबाजीने पोखरलेल्या राष्ट्रवादीस क्षीरसागर, पंडित, मुंदडा यांच्या नाराजीमुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या तीनही दिग्गजांची नाराजी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर असल्याने धनंजय मुंडेंना लोकसभेत आपला करिष्मा दाखवणं हे आव्हान ठरणार आहे.

VIDEO: दाऊदबद्दल प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 02:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...