News18 Lokmat

देशाची घटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं आहे का? - धनंजय मुंडे

'2014 मध्ये मोदी लाट होती. मात्र, 2019ला काँग्रेस राष्ट्रवादीचं वादळ आहे. यात कमळाच्या पाकळ्या राहणार नाहीत.'

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 07:11 PM IST

देशाची घटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं आहे का? - धनंजय मुंडे

बीड, 14 एप्रिल : देशाची घटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं आहे का ? असं म्हणत पंकजा मुंडेवर धनंजय मुंडे यांनी हल्ला चढवला आहे. यावेळी सरकारवर जोरदार टीका केली. 'बहुतेक मोदी साहेबांना विस्मरणाचा रोग निर्माण झाला असावा? प्रचारानिमित्त महाराष्ट्र येतात तेव्हा पवार साहेबांचवर टीका करतात आणि निवडणूक संपली की मोदींना पवार साहेबांची करंगळी आठवते.' असंही धनंजय मुंडे म्हणाले.

'2014 मध्ये मोदी लाट होती. मात्र, 2019ला काँग्रेस राष्ट्रवादीचं वादळ आहे. यात कमळाच्या पाकळ्या राहणार नाहीत. महाराष्ट्र पाण्याच्या दुष्काळापेक्षा मोदी दुष्काळामुळे मोठे चटके बसले आहेत. देशाची लोकशाही धोक्यात आहे. पण आता असं होणार नाही' अशा शब्दात धनंजय मुंडेंनी मोदींवर टीका केली.

'काल पंकजा मुंडेंनी घटना बदलायची आहे. त्यामुळे खासदार म्हणून निवडून द्या' असं आव्हान केलं त्या पंकजा मुंडेंना घटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही' असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे, माजी मंत्री सुरेश नवले, बजरंग सोनवणे, माजी आमदार उषा दरडेंसह इतर नेतेमंडळी उपसस्थित होते.


Loading...

VIDEO: आणि म्हणून मोदींऐवजी बारामतीत अमित शहा घेणार सभा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 07:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...