...जेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे येतात एकाच व्यासपीठावर

...जेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे येतात एकाच व्यासपीठावर

परळी शहरामध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

  • Share this:

बीड, 11 फेब्रुवारी : राजकारणामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे परळीमध्ये एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले आहेत. परळी शहरामध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

या बहिण-भावाला सोबत आणण्याचं औचित्य होतं परळी शहरातील साहित्यिक व शिक्षण क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ शिक्षक आबासाहेब वाघमारे गुरुजी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दोघांनाही परळीकरांनी पाहिले.

या कार्यक्रमात राज्याच्या ग्रामविकास मंत्री नामदार पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांनीही बाबासाहेब वाघमारे गुरुजी यांचा गौरव सत्कार केला. या दोघांनाही एकाच व्यासपीठावर पाहिल्यानंतर परळीकरांच्या भुवया उंचावल्या.

राजकारणात विरोध करणारे बहीण भाऊ येणाऱ्या निवडणुकांच्या अगोदर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना पण एका व्यासपीठावर आले यामुळे बीड जिल्ह्यात तरी चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान,  बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मुंडे घराण्याचं कायम वर्चस्व आहे. अतंर्गत राजकारणामुळे धनंजय मुंडे यांनी आपला वेगळा मार्ग निवडला. मात्र त्याची सल अजुनही पंकजा मुंडे यांना जाणवत असते त्या बीडमध्ये आयोजित नगरपरिषदेच्या कार्यक्रमात बोलल्या होत्या. 'राजकारणात सुसंस्कृतपणा पाळावा असे संकेत आहे. कुणाचं घर फोडून राजकारण करू नये' असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना लगावला होता.

यावर धनंजय मुंडे यांनीही त्यांना प्रत्यूत्तर दिलं होतं. 'माझं घरफोडीला समर्थन नाही. राजकारणात घरफोडीच्या घटना आजपर्यंत खूप घडल्या आहे. जयदत्त क्षीरसागर यांचं घर कुणीही फोडलं नाही. घर सांभाळून ठेवणे हे घरच्या मोठ्या व्यक्तीचे काम आहे. अलीकडेच झालेल्या मेळाव्यात जयदत्त क्षीरसागर कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुळात घरफोडी आणि राजकारणातील घरफोडी ही वेगळी आहे' असं मत धनंजय मुंडेंनी व्यक्त केलं होतं.


VIDEO : 'आज बाळासाहेब असते तर...' ठाकरे सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2019 08:04 AM IST

ताज्या बातम्या