जालना: धामणा धरणाच्या भिंतीला तडे, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

भोकरदन तालुक्यातील सेलूद येथे धामणा धरणाच्या (मध्यम प्रकल्पाला) भिंतीला तडे गेले असून भिंतीतून पाणी पाझरत आहे. विशेष म्हणजे धरणात 90 टक्के पाणी साठा आहे.

विजय कमळे पाटील विजय कमळे पाटील | News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 03:55 PM IST

जालना: धामणा धरणाच्या  भिंतीला तडे, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

जालना, 3 जुलै- भोकरदन तालुक्यातील सेलूद येथे धामणा धरणाच्या (मध्यम प्रकल्पाला) भिंतीला तडे गेले असून भिंतीतून पाणी पाझरत आहे. विशेष म्हणजे धरणात 90 टक्के पाणी साठा आहे. गेल्या 5 वर्षांत प्रथमच धरणात एवढा पाणी साठा आहे. धरणाच्या भिंतीतून पाणी पाझरत असल्याने आजूबाजूच्या गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरणावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणाफुटी घटनेची पुनरावृत्ती जालन्यात होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले आहे. धामना धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले असून भिंतीतून मोठ्या प्रमाणावर पाणी पाझरत आहे. गेल्या सहा दिवसांपासून भोकरदनसह परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. ज्यामुळे धामना धरणात 90 टक्के पाणी साठा झाला. गेल्या 5 वर्षांत प्रथमच धरणात एवढा मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे जाऊन पाणी पाझरत असल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धरण अतिप्राचीन असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानुसार देखभाल दुरुस्तीचा निर्णय घेतला जाईल. ग्रामस्थांनी घाबरण्याचे काही कारण नाही. खबरदारीचा इशारा म्हणून आपत्ती व्यवस्थापन पथकासह सेनेच्या एका तुकडीला इथे पाचारण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तिवरे धरणप्रकरणी मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून या घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याची घटना काल रात्री घडली. त्यात एक वाडी वाहून जाऊन काही लोक बेपत्ता झाले आहेत, तसेच काही मृतदेह हाती लागले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून सुरु असलेल्या मदतकार्याची त्यांनी माहिती घेतली. या दुर्घटनेची चौकशी करुन पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Loading...

VIDEO: एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं...लोकांनी हंबरडा फोडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2019 03:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...