मी पुन्हा येईन...अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

मी पुन्हा येईन...अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

'मी पुन्हा येईन' असं सांगत पुन्हा एकदा सत्तेत येण्याचे संकेत देत विरोधकांबरोबरच मुख्यमंत्रीपदाबाबत आमचं ठरलं असं म्हणणाऱ्या शिवसेनेलाही योग्य संदेश दिला.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 2 जुलै : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मंगळवारी 2 जुलै रोजी संपलं. या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन होतं. काही महिन्यातच विधासभेच्या निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात सगळी छाया ही विधानसभा निवडणुकीचीच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शेवटच्या भाषणात राजकीय फटकेबाजी केली आणि 'मी पुन्हा येईन' असं सांगत पुन्हा एकदा सत्तेत येण्याचे संकेत देत विरोधकांबरोबरच मुख्यमंत्रीपदाबाबत आमचं ठरलं असं म्हणणाऱ्या शिवसेनेलाही योग्य संदेश दिला.

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप जाहीर केलेलं नाही. त्याबद्दल आमचं ठरलं आहे, कुणीही याबद्दल बोलू नये अशी तंबीच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येईन ही कविता म्हणत मुख्यमंत्री कोण असेल याचे स्पष्ट संकेत दिल्याचं बोललं जातंय.

VIDEO : सावधानतेचा इशारा ! पुढील 48 तासांत कोसळ'धार'

काय म्हणाले मुख्यमंत्री आपल्या भाषणात?

मी राज्यातल्या जनतेला दंडवत करण्याचा गेली 5 वर्ष प्रयत्न केला पायाभूत सोयीसुविधा, शेती, उद्योग यात मोठं काम केलं. राज्याचं वैभव कमी होत होतं, ते परत आणण्यात यशस्वी झालो. जलयुक्त शिवारचं यश हे जनतेचं आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वेगळा वापर करु शकलो, त्यात 550 कोटींचा निधी वितरित केला. विदर्भाचा विजेचा अनुशेष भरुन काढला. जलसिंचनाची कामं केली. विरोधकांनी सभागृहात सहकाराची भावना ठेवली असं कौतुकही त्यांनी केलं.

काय आहे कविता?

"शेवटी सांगतो - मी पुन्हा येईन, याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी, नव महाराष्ट्राच्या निर्माणासाठी,

मी पुन्हा येईन, गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी

मी पुन्हा येईन, बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नवयुवकांनी न्याय देण्यासाठी

मी पुन्हा येईन, याच ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीची साथ घेईन त्याचा हात हातात घेईन

विधानसभेसाठी रोहित पवारांचा मतदारसंघ अखेर ठरला

दादांना 'क्लिन' चीट

काही वेळा आरोप होतात त्यात काही काळ बदनामी होते. पण अंतिमत: विजय सत्याचाच होतो. जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर जे आरोप केले होते त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टिकरण दिलं. ते म्हणाले, तुम्ही गेले काही दिवस दादांवर आरोप केले आहेत. दादांनी पाच वर्षात असं काम केलंय की त्यांच्याकडे आलेला माणूस काम झाल्यावरच परत जातो. गेल्या 30-35 वर्षात मी दादांना ओळखतो, त्यांचा एखादा निर्णय चुकू शकतो पण त्यात दुर्भावना नाही.

मी सर्वसमावेशकतेने काम करण्याचा प्रयत्न केला मी सकारत्मकता कधीच सोडली नाही सगळ्यांना सोबत ठेवता येईल असा प्रयत्न केला. गेल्या 15-20 वर्षात ते प्रश्न सुटले नाहीये ते 5 वर्षात सुटले. मला हे काम सोप्पं नाहीये याची जाणीव होती. जे जे समोर आले त्याला सामोरं गेलो. 12 कोटी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 10:26 PM IST

ताज्या बातम्या