Elec-widget

..तर नाणारचा प्रकल्प गुजरातला जाईल - मुख्यमंत्र्यांचा इशारा

..तर नाणारचा प्रकल्प गुजरातला जाईल - मुख्यमंत्र्यांचा इशारा

तर हा 3 लाख कोटींचा प्रकल्प कदाचित गुजरातलाही जाऊ शकतो, तसंही गुजरात सरकारने यापूर्वीच संबंधित कंपनीला आमंत्रित केलं आहे. असा थेट संदेशच मुख्यमंत्र्यांनी दिलाय.

  • Share this:

13 एप्रिल: रत्नागिरी जिल्ह्यातील  नाणार प्रकल्पाला  असाच विरोध होत राहिला तर नाणारचा प्रकल्प अखेर गुजरातला जाईल असा सूचक इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. कोकणातील राजकीय नेते नाणारच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत.तेल काढण्याचा मोठा प्रकल्प नाणार इथे आणण्याचा सरकारचा मनसुबा आहे.

सरकारमधीलच शिवसेना, तसंच  नारायण राणे हे या  नाणारच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत. या प्रकल्पामुळे 1 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे.पण त्यामुळेच कोकणाच्या निसर्गाचं, मासेमारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे.    या  विरोधाच्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यांनी हा सूचक इशारा दिलाय. अराम्को कंपनी भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या हद्दीतच ऑईल रिफायनरीचा प्रकल्प टाकू इच्छिते. म्हणूनच राज्य सरकारने त्यांना नाणारचा प्रस्तावही दिला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने दुजोरा दिला आहे.   पण या प्रकल्पाला असाच विरोध वाढत कायम राहिला तर हा 3 लाख कोटींचा प्रकल्प कदाचित गुजरातलाही जाऊ शकतो, तसंही गुजरात सरकारने यापूर्वीच संबंधीत कंपनीला आमंत्रित केलं आहे. असा थेट संदेशच मुख्यमंत्र्यांनी दिलाय.,

याआधीही देशातील विविध राज्यातील प्रकल्प असेच गुजरातने ओढले आहे. या प्रकल्पामुळे कोकणाचा औद्योगिक विकास शक्य आहे असं सरकारचं मत आहे. तर यामुळे कोकणाच्या निसर्गाची हानी होईल अशी विरोधकांची भूमिका आहे. नाणार प्रकल्पातील  बऱ्याच जमिनी नापीक आहेत.

आता हा प्रकल्प महाराष्ट्रात येतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2018 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...