कर्जमाफीवर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा

कर्जमाफीवर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत एक तास भेट घेतली. या भेटीत शरद पवारांनी राज्यसरकारला सगळी मदत करायचे आश्वासन दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

  • Share this:

23 जून : जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे समाधान करून राज्याच्या तिजोरीवरचा भार कसा सांभाळता येईल याबाबत सरकारने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. याच अंतर्गत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुलमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत एक तास भेट घेतली. या भेटीत शरद पवारांनी राज्यसरकारला सगळी मदत करायचे आश्वासन दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

सुकाणू समितीच्या बैठकीत सर्व समाधान होऊ न शकल्याने आणि राजकीय पक्ष विरोधात पुन्हा उभे राहू नयेत यासाठी सरकार सर्व पक्षीय नेत्यांशी आता चर्चा करत आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 11:49 AM IST

ताज्या बातम्या