मुंबईत लोकसंख्या वाढली,पण सोयीसुविधा वाढल्या नाही-मुख्यमंत्र्यांची कबुली

मुंबईत लोकसंख्या वाढली,पण सोयीसुविधा वाढल्या नाही-मुख्यमंत्र्यांची कबुली

मुंबईत जास्तीत जास्त उन्नत रेल्वे आणि रस्ते मार्ग उभारणार असल्याचं ते म्हणाले. पियूष गोयल यांच्या एका निर्णयाचं त्यांनी कौतुक केलं. प्रवासी पुल आणि स्थानकं हे आतापर्यंत प्रवासी सोयी या यादीत मोडत नव्हते

  • Share this:

नागपूर,30 सप्टेंबर:मुंबईत लोकसंख्या वाढली पण सोयीसुविधा वाढल्या नाही अशी कबूली मुख्यमंत्र्यांनी दिलीआहे. काल मुंबईत एलिफिन्स्टन ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 22 लोक स्टेशनवर  मृत्यूमुखी पडले होते.

मुंबईत चेंगराचेंगरीसारखी घटना पुन्हा घडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली आहे. मुंबईत जास्तीत जास्त उन्नत रेल्वे आणि रस्ते मार्ग उभारणार असल्याचं ते म्हणाले. पियूष गोयल यांच्या एका निर्णयाचं त्यांनी कौतुक केलं. प्रवासी पुल आणि स्थानकं हे आतापर्यंत प्रवासी सोयी या यादीत मोडत नव्हते. कालपासून ते प्रवासी सुरक्षेच्या यादीत टाकण्यात आले आहेत. या यादीला प्राधान्य सर्वात जास्त असतं, असं ते म्हणाले. मुंबईची लोकसंख्या वाढली पण सोयीसुविधा वाढल्या नाहीत, अशी कबुलीही त्यांनी दिली. मुंबईत एलिवेटेड रोड रेल कोरिडॉर मोठ्या प्रमाणात उभारणार असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2017 03:05 PM IST

ताज्या बातम्या