महादेव जानकरांकडे मागितली 30 कोटींची खंडणी, 5 जण अटकेत!

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडे 30 कोटीची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 9, 2019 09:39 PM IST

महादेव जानकरांकडे मागितली 30 कोटींची खंडणी, 5 जण अटकेत!

बारामती, 09 मे: राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडे 30 कोटीची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व जण रासपचे माजी कार्यकर्ते असून त्यांनी आता वेगवेगळ्य राजकीय पक्षात प्रवेश केला आहे.

जानकर यांच्याकडे डॉ.इंद्रकुमार भिसे, सचिन पडळकर, दत्ता खरे, विकास अदगल आणि तात्यासो कारंडे यांनी खंडणी मागितली होती. यासंदर्भात बारामती शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करत त्यांना अटक केली. या पाच जणांनी 4 मे रोजी आणि त्यानंतर 9 मे रोजी दुसऱ्यांना खंडणी मागितली होती. हे सर्वजण माळसिरस आणि अकलूजमधील असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर बदनामी करणार या प्रकरणावरून त्यांनी खंडणी मागितल्याचे समजते.


'मनसे फॅक्टर'चा मावळमध्ये पार्थ पवारांना होईल का फायदा? पाहा हा SPECIAL REPORT

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 09:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...