चंद्रकांत फुंदे (प्रतिनिधी) देहू, 25 जून: आषाढी वारीच्या भक्तीसोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. संत तुकोबांच्या पालकीचं प्रस्थान झालं असून ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम म्हणत भाविक पंढरपुराकडे निघाले आहेत. या वारीमध्ये माजी वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी सहभाग घेतला आहे. वारीचा त्यांचा अनुभव कसा आहे याबाबत त्यांच्याशी खास बातचित केली आहे.