साईबाबांचा जन्मस्थळाबाबत राष्ट्रपतींच्या विधानामुळे शिर्डीत वाद

साईबाबांचा जन्मस्थळाबाबत राष्ट्रपतींच्या विधानामुळे शिर्डीत वाद

राष्ट्रपतींनी भाषणात साईबाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात झाल्याचा उल्लेख केल्यानं नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

  • Share this:

शिर्डी, 2 ऑक्टोबर: देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साई समाधी शताब्दी सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. मात्र राष्ट्रपतींनी भाषणात साईबाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात झाल्याचा उल्लेख केल्यानं नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

साईबाबा शिर्डीत आल्यापासून आजपर्यंत त्यांचा जन्म कुठे झाला अथवा साईबाबा कोणत्या धर्माचे होते याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जातात. त्यातच आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साईबाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी झाला असल्याच विधान करुन नव्या वादाला तोंड फोडलं आहे. साईबाबांच्या चरित्रामध्ये   त्यांच्या जातीधर्माचा किंवी जन्मस्थळाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यांच्या जन्मापेक्षा त्यांचे शिर्डीतील कार्य खूप महत्त्वाचे आहे असे अनेकांचे मत आहे. काही वर्षांपूर्वी साईबाबांची पूजा करणं चुकीचं आहे असं विधान केल्यामुळे द्वारका पीठाचे शंकराचार्य ही वादात अडकले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 09:45 AM IST

ताज्या बातम्या