S M L

न्याय मिळाला पण माझी छकुली नाही हो भेटली,'निर्भया'च्या आईला अश्रू अनावर

"माझ्या छकुलीसाठी अवघा मराठी समाज रस्त्यावर उतरल माझ्या छकुलीला न्याय मिळाला"

Sachin Salve | Updated On: Nov 29, 2017 12:50 PM IST

न्याय मिळाला पण माझी छकुली नाही हो भेटली,'निर्भया'च्या आईला अश्रू अनावर

29 नोव्हेंबर : अखेर कोपर्डी प्रकरणातील तिन्ही नराधामांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.  'माझ्या छकुलीला न्याय मिळाला पण माझी छकुली मला परत नाही मिळाली' अशी प्रतिक्रिया देत निर्भयाच्या आईला अश्रू  अनावर झाले.

अवघ्या महाराष्ट्र ज्या निकालाकडे डोळे लावून होता त्या कोपर्डी प्रकरणात तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आज खऱ्या अर्थाने कोपर्डी प्रकरणातील निर्भयाला न्याय मिळाला आहे.

या निकलासाठी पीडित मुलीचे आई-वडील, सगळे नातेवाईक आणि अन्य सगळ्यांनी कोर्टाच्या आवारात गर्दी केली होती. निकालानंतर सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. मीडियाशी बोलताना निर्भयाच्या आईने समाधान व्यक्त केलं. पण आपली छकुलीला गमावल्याचं दु:खही त्यांनी व्यक्त केली.

'न्यायालयावर आमचा विश्वास होता, न्यायालयाने अतिशय योग्य शिक्षा दिली आहे. उज्ज्वल निकमांवर आणि अवघ्या महाराष्ट्रावर माझा विश्वास होता. म्हणून माझ्या चिमुकलीला न्याय मिळाला. माझ्या छकुलीसाठी अवघा मराठी समाज रस्त्यावर उतरल माझ्या छकुलीला न्याय मिळाला पण माझी छकुली मला परत नाही मिळाली असं सांगताना निर्भयाच्या आईला अश्रू अनावर झाले.

कोपर्डी प्रकरणातील निर्भयाला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा मोर्चे निघाले होते. या सगळ्यांचे आभारही निर्भायाच्या आई-वडिलांनी मानले. फाशीच्या निर्णयाने आमच्या चिमुकलीला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. आता असा गुन्हा करणाऱ्यांवर जबर बसेल असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close