कीटकनाशक फवारणी करताना सोलापुरातही 1 मजूराचा मृत्यू

आता पश्चिम महाराष्ट्रातही अशीच घटना घडली आहे. द्राक्षाच्या बागेत फवारणी करताना शेतकऱ्यांना आणि मजूरांना काल विषबाधा झाल्याची घटना घडली

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2017 11:48 AM IST

कीटकनाशक फवारणी करताना सोलापुरातही 1 मजूराचा मृत्यू

सोलापूर,28ऑक्टोबर: यवतमाळ कीटकनाशक फवारणीतून मृत्यू प्रकरण ताजं असताना आता सोलापूरमध्ये असाच एक दुर्दैवी प्रकार घडलाय. बार्शीत  द्राक्षावर फवारणी करताना आनंद माने या 22 वर्षांच्या शेतमजुराचा मृत्यू झालाय.

काही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये कीटकनाशकाच्या फवारणीतून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर विदर्भातील बाकी जिल्ह्यातून असे मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली होती. पण आता पश्चिम महाराष्ट्रातही अशीच घटना घडली आहे. द्राक्षाच्या बागेत फवारणी करताना शेतकऱ्यांना आणि मजूरांना काल विषबाधा झाल्याची घटना घडली. आधी या शेतकऱ्यांवर ग्रामीण रूग्णालयत उपचार चालू होते. नंतर त्यांना सोलापुरातल्या जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. त्यातच माने यांचा मृत्यू झाला आहे. एकूण 7 जणांना विषबाधा झाली होती, 6 मजुरांवर उपचार सुरू आहेत.

बार्शी औषध फवारणी मृत्यू संपूर्ण घटनाक्रम

1)14 ऑक्टोबर रोजी 11 मजुरांनी आनंद काशीद यांच्या शेतात द्राक्ष काड्याना हायड्रोजन सायनामाईड औषध वापरलं.

2)द्राक्ष काड्याना फुटवे फुटण्यासाठी हे औषध वापरलं जातं

Loading...

3)औषधाचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त वापरलं

4)शेतमजुरांना शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी त्रास चालू झाल्याने खाजगी दवाखान्यात दाखल केलं

5)आनंद माने याला त्याचदिवशी सोलापूर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केलं

5)गेल्या 15 दिवसापासून तो मृत्यूशी झुंज देत होता,मात्र दुर्दैवी त्याचा आज मृत्यू झाला

6)दरम्यानच्या काळात कृषी विभाग आणि पंचाय समितीने कीटकनाशक दुकानदारांना मार्गदर्शन,आणि तंबी दिली

7)एवढा सगळा गंभीर प्रकार होऊनही अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2017 11:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...