अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी... हातावरची मेंदी पुसण्याआधीच नववधूचा मृत्यू

'अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..', अशीच एक घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही या गावात घडली आहे. हातावरची मेंदी पुसण्याआधीच नववधूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 04:22 PM IST

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी... हातावरची मेंदी पुसण्याआधीच नववधूचा मृत्यू

सुरेश जाधव (प्रतिनिधी)

बीड, 5 जून- 'अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..', अशीच एक घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही या गावात घडली आहे. हातावरची मेंदी पुसण्याआधीच नववधूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोमल संजय शेलार (वय-20) असे मृत्यू झालेल्या नवविवाहीतेचे नाव आहे. कोमलच्या लग्नाचा सोळावा उद्या होणार होता. मात्र त्या आगोदरच तिने जगाचा निरोप घेतला.

कोमल आणि संजयचा अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर सोळाव्याच्या एकदिवस आगोदर कोमलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संजयच्या जीवनात अर्ध्या वरती डाव मोडला...अधुरी एक कहाणी...अशी वेळ आली आहे. कोमल घरात साफसफाई करताना तिला कुलरचा शॉक बसला. त्यात कोमलचा जागेवरच मृत्यू झाला. या दुखद घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी सांयकाळी बीडसह जिल्ह्यात सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे कोमल ही घरात आलेली धूळ साफ करत होती. वाऱ्यामुळे वायरच्या तार मोकळ्या होऊन कुलरमध्ये करंट उतरला होता. ते कोमलच्या लक्षात आले नाही. ती घरातील केर काढत असताना तिला कुलरचा शॉक लागला. त्यातच कोमलचा जागेवर मृत्यू झाला.


Loading...

VIDEO: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश आंबेडकरांच्या संपर्कात? काय म्हणाले अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2019 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...