S M L

खड्डेमुक्त रस्त्यांची डेडलाईन आज संपणार; बऱ्याच ठिकाणी खड्डे जैसे थे

15 डिसेंबरपर्यंत खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी केली होती. मात्र डेडलाईन संपल्यावरही अनेक प्रमुख रस्ते खड्डेयुक्तच राहणार आहेत

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 15, 2017 11:07 AM IST

खड्डेमुक्त रस्त्यांची डेडलाईन आज संपणार; बऱ्याच ठिकाणी खड्डे जैसे थे

15 डिसेंबर: राज्यातील सगळे रस्ते 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त होतील असं आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं होतं. मग आता खड्डे दिसले तर चंद्रकांत पाटील 1 हजार रूपये देणार का असा प्रश्न सर्वच थरातून विचारला जातोय.

15 डिसेंबरपर्यंत खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी केली होती. मात्र डेडलाईन संपल्यावरही अनेक प्रमुख रस्ते खड्डेयुक्तच राहणार आहेत. मात्र अद्यापही राज्यातील अनेक प्रमुख रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे रस्त्यावर मधोमध असणारे हे खड्डे जो दाखवेल त्याला एक हजार रुपये मिळणार का याचं उत्तर बांधकाममंत्रीच देऊ शकतील. मात्र राज्यातील अनेक हायवेंवर खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

रस्त्यातील खड्ड्यांविरूद्ध विरोधकांनी आंदोलनही केलं होतं. खासदार सुप्रियाताई सुळे यांचं सेल्फी विथ खड्डे हे आंदोलन प्रचंड गाजलं होतं. आता या सगळ्यानंतर काही ठिकाणचे खड्डे बुजले असले तरी बऱ्याच ठिकाणची परिस्थिती बदलेली नाही. त्यामुळे यावर आता चंद्रकांत दादा काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 11:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close