गोंदिया,19 जुलै: गोंदिया जिल्ह्यात बालकांसाठी राबवण्यात आलेली पोषण आहार योजना मुलांच्याच जीवावर बेतत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोषण आहाराच्या मसूर डाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळल्यानं खळबळ उडाली. याची माहिती आंगनवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.