मटक्याच्या वादातून तीन जणांवर गोळीबार करणारा संजय शिंदे पोलिसांच्या ताब्यात

दौंड शहरात तिघांची हत्या करणारा राज्य राखीव पोलीस दलाचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. संजय शिंदे यानं मटक्याच्या वादातून सकाळी दौंडमध्ये गोळीबार करत तिघांची हत्या केली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2018 10:05 AM IST

मटक्याच्या वादातून तीन जणांवर गोळीबार करणारा संजय शिंदे पोलिसांच्या ताब्यात

17 जानेवारी : दौंड शहरात तिघांची हत्या करणारा राज्य राखीव पोलीस दलाचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. संजय शिंदे यानं मटक्याच्या वादातून सकाळी दौंडमध्ये गोळीबार करत तिघांची हत्या केली. या गोळीबारात अमोल जाधव, गोपाल शिंदे आणि प्रशांत पवार या तिघांचा मृत्यू झाला.

सुरुवातीला गोळीबार केल्यानंतर संजय शिंदे हा गोपाळनगरच्या त्याच्या घरात लपून बसल्याचा पोलिसांचा संशय होता. पोलिसांनी त्याच्या घराला वेढाही घातला. पण दरम्यानच्या काळात संजय घरातून पळून गेला होता. पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीनं त्याचा तपास घेतला, आणि तो सुप्यात असल्याचं आढळलं. पोलिसांनी सुप्यातून त्याच्या मुसक्या आवळल्या.

संजय शिंदेला अटक करण्यासाठी पोलिसांना खूप सुरक्षा पाळावी लागली होती. शिंदेला पोलिसांना शरण येण्याच आवाहन करूनही तो पोलिसांना शरण आलेला नाही त्यामुळे त्याच्याकडे नेमके किती राऊंडस आहेत याचीही माहिती पोलिसांकडे नसल्यामुळे ग्रामीण पोलिसांनी बुलेटप्रूफ जॅकेट आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीमला पाचारण करण्यात आलं होतं. या सगळ्या अथक प्रयत्नानंतर शिंदे अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2018 10:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...