आर. आर. आबांच्या कन्येचा आज विवाह सोहळा

आर. आर. आबांच्या कन्येचा आज विवाह सोहळा

स्मिता पाटील यांचा विवाह पुण्यातले बांधकाम व्यावसायिक आनंद थोरात यांच्याशी होणार आहे. मरगपट्टा सिटीमध्ये हा सोहळा संपन्न होईल

  • Share this:

01 मे: राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज पार पडणार आहे. स्मिता पाटील यांचा विवाह पुण्यातले बांधकाम व्यावसायिक आनंद थोरात यांच्याशी होणार आहे. मरगपट्टा सिटीमध्ये हा सोहळा संपन्न होईल. स्मिता पाटील या सध्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत.

आर. आर. आबांच्या निधनानंतर पाटील त्यांच्या कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी स्वतः शरद पवारांनी घेतली आहे. म्हणूनच आज होणारं  लग्न जुळवून आणण्यासाठी स्वतः पवारसाहेबांनीच पुढाकार घेतला होता. आर. आर. पाटील आणि रमेश थोरात हे दोघेही शरद पवार यांचे खंदे समर्थक. ही दोन कुटुंबं एकत्र यावीत अशी पवार यांचीही इच्‍छा असल्याने त्यांनीच या विवाहाची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे, असं रमेश थोरात यांनी सांगितलं होतं. तसंच शरद पवार हे लग्‍न समारंभासाठी दिवसभर स्‍वत: थांबणार आहेत.

माजी गृहमंत्री आर. आर. आबांच्या निधनानंतर त्यांच्या तासगाव मतदार संघाचे नेतृत्‍व पत्‍नी सुमनताई पाटील यांच्याकडे आहे. त्यात तिथल्या आमदारही आहेत.  सुप्रिया सुळे यांचंही आर. आर. पाटलांच्या कुटुंबियांकडे विशेष लक्ष असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2018 07:18 AM IST

ताज्या बातम्या