क्षणात वडिलांपासून दुरावली मुलगी, अपघातात डोक्यावरून एसटीचं चाक गेल्याने जागीच मृत्यू

कोल्हापूरमध्ये वडिलांसमोर मुलीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावातील ही धक्कादायक घटना आहे. विद्यार्थीनी तिच्या वडिलांसोबत बाईकवर घरी येत असताना हा अपघात झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 8, 2019 01:48 PM IST

क्षणात वडिलांपासून दुरावली मुलगी, अपघातात डोक्यावरून एसटीचं चाक गेल्याने जागीच मृत्यू

कोल्हापूर, 08 जानेवारी : कोल्हापूरमध्ये वडिलांसमोर मुलीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावातील ही धक्कादायक घटना आहे. विद्यार्थीनी तिच्या वडिलांसोबत बाईकवर घरी येत असताना हा अपघात झाला आहे.

प्रियांका पवार असं मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. ती तिच्या वडिलांसोबत बाईकवर घरी येत होती. यावेळी बाईक घसरली आणि प्रियांका खाली पडली. पण त्याचवेळी मागून येणाऱ्या एसटीने प्रियांका चिरडली गेली. यात एसटीचं चाक डोक्यावरून गेल्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

बाईक घसरून झालेल्या अपघातामध्ये प्रियांकाचे वडिल किरकोळ जखमी झाले आहेत. घटना घडताच परिसरात बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. एसटी बसखाली चिरडल्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण पोलिसांच्या येण्यानंतर परिस्थिती सावरण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रियांकाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्या पोटच्या गोळ्याचा डोळ्यासमोर जीव जाताना पाहून प्रियांकाच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. घरातल्या हसत्या खेळत्या पाखराला असं गमावल्याने संपूर्ण पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तर परिसरातून यावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Loading...

तर नेमका हा अपघात कसा झाला? याचा आता नेसरी पोलीस कसून तपास करत आहेत. यात पोलीस एसटी चालकाचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यामातून काही माहिती मिळते का ? याचाही पोलीस शोध घेत आहेत.


VIDEO : अशा किड्यामुळे हजारो लोकांनी कोबी खायचंच सोडून दिलं!बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 01:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...