शोकसागरात बुडाले दापोली; चार भावांवर एकाच वेळेस अंत्यसंस्कार

दुर्घटनेत मृत पावलेल्या 20 जणांवर रविवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2018 05:10 PM IST

शोकसागरात बुडाले दापोली; चार भावांवर एकाच वेळेस अंत्यसंस्कार

मुंबई, ता. 28 जुलै : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे 30 कर्मचा-यांचा पोलादपूर - महाबळेश्वर घाटात बस दुर्घटनेट दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत पावलेल्या 20 जणांवर रविवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दापोली तालुक्यातील गिम्हवणे-झगडे वाडी येथील एकाच कुटुंबातील 4 चुलत भाऊ या दुर्घटनेत मृत पावले. त्या चौघांवरही एकाच वेळी गिम्हवणे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी हे उपस्थित होते.

दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा पोलादपूर ते महाबळेश्वरदरम्यान आंबेनळी घाटात कोसळून अपघात झाला. या अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या या अपघातातील ३० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे मदतकार्य पूर्ण झाले असून, ३0 पैती २० मृतदेहांवर रविवारी सकाळी दापोली, जालगाव आणि गिमवणे येथे रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेत दापोली तालुक्यातील गिम्हवणे-झगडे वाडी येथील एकाच कुटुंबातील 4 चुलत भाऊ मृत पावलेत. त्या चौघांवरही रविवारी सकाळी गिम्हवणे स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शोकसागरात बुडालेल्या दापोली, जालगाव आणि गिमवणे येथील नागरिकांनी रविवारी बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवली आहे.

दापोली अपघात- ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले, २५ तासांनी बचावकार्य पूर्ण

ट्रेकर्सना विशेष प्रशिक्षण देणार

आंबेनळी दुर्घटनेचे मदतकार्य पुर्ण झाले असून ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, मदतकार्य पुर्ण झाल्याचं एनडीआरएफने जाहीर केलय. रात्री अंधार, धुंक आणि पाऊस यांमुळे बचावकार्यात बरेच अडथळे आले. पण एनडीआरएफचे जवान आणि सह्याद्री ट्रेकर्स व पुंडलिका ट्रेकर्स यांनी रात्रभर प्रत्यन करुन मृतदेह वर काढलेत. ट्रेकर्सच्या मदतीने बचाव कार्य करण्यास खुप मदत झाली असून, या ट्रेकर्सना विशेष प्रशिक्षण देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलयं.

Loading...

आंबेनळी घाटात सुरक्षा भिंतींसह माहिती फलके लावणार

आंबेनळी घाटाच्या दरीकडील कड्यांना पुर्ण सुरक्षा भिंत लवकरात लवकर बांधली जाईल असे रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलय. तर अशी दुर्घटना पुन्हा घडल्यास नागरीकांना लवकरात लवकर पोलीसांशी संपर्क साधता यावा यासाठी घाटात विशेष फलके लावली जाणार असल्याचं पोलीस अघिक्षक यांनी स्पष्ट केलयंं.

हेही वाचा..

'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत'

पुण्यात गांज्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

नरेंद्र मोदींबद्दल कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2018 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...