News18 Lokmat

दंतेवाड्यात माओवादी कमांडर विनोद हुंगा यानेच रचला होता भाजप आमदाराच्या हत्येचा कट

माओवादी कमांडर विनोद हुंगा यानेच आमदार भीमा मंडावी यांची हत्येचा कट रचला होता. 55 वर्षीय विनोद हुंगा हा माओवाद्यांचा गड मानल्या जाणा-या कटेकल्याण भागाचा कमांडर आहे. मागील दोन महिन्यांपासून त्याचे मालंगीर भागात येणे-जाणे वाढले होते.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 05:35 PM IST

दंतेवाड्यात माओवादी कमांडर विनोद हुंगा यानेच रचला होता भाजप आमदाराच्या हत्येचा कट

दंतेवाडा, 12 एप्रिल- छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा क्लू लागल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, माओवादी कमांडर विनोद हुंगा यानेच आमदार भीमा मंडावी यांची हत्येचा कट रचला होता. 55 वर्षीय विनोद हुंगा हा माओवाद्यांचा गड मानल्या जाणा-या कटेकल्याण भागाचा कमांडर आहे. मागील दोन महिन्यांपासून त्याचे मालंगीर भागात येणे-जाणे वाढले होते.

'हिंदुस्तान टाइम्स'मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार विनोद हुंगा हाच दंतेवाडामध्ये मंगळवारी (9 एप्रिल) झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. त्या नेतृत्त्वात 60 माओवाद्यांनी आमदार भीमा मंडावी यांच्या ताफ्यावर हल्ला घडवून आणला. हल्ल्या भीमा मंडावी, त्यांचा चालक आणि तीन पोलिस कॉन्स्टेबल्सचा मृत्यु झाला होता. या वृत्ताला पोलीस सूत्रांकडून दुजोरा मिळाला आहे. पोलिसांनी विनोद हुंगा याच्यावर आठ लाख रुपयांचे बक्षीस आहे.

नक्षलवाद्यांच्या दबावापुढे न झुकता दिवंगत आमदाराच्या पत्नीनं केलं मतदान

छत्तीसगडमध्ये मतदानापूर्वी तीन दिवस आधी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला. त्यात 5 जणांचा मृत्यु झाला. यात भाजप आमदारांचाही समावेश आहे. दिवंगत भीमा मंडावी या भाजप आमदारांची पत्नी ओजस्वी यांनी पतीच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवशी मतदानासाठी बाहेर पडून लोकशाहीची खरी ताकद दाखवून दिली.

जिथे हा माओवादी हल्ला झाला तिथेच नक्षलवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाला झुगारून मतदानासाठी अशा रांगा लागल्या होत्या.

Loading...

भाजप आमदार भीमा मंडावी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी श्यामगिरी इथली सभा संपवून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. तेच हे गाव. छत्तीसगडमधल्या दंतेवाडा इथल्या जंगलात नक्षलवाद्यांनी दोनच दिवसांपूर्वी 9 एप्रिलला मोठा हल्ला घडवला होता.


VIDEO : सुजय विखेंच्या प्रचार सभेत रामदास आठवलेंची 'लय भारी' कविता

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-361666" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzYxNjY2/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 05:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...