S M L

VIDEO: अहो, ड्रायव्हर साहेब ही 'टारझन कार' नाही, बस आहे!

राज्य परिवहन विभागाच्या दर्यापूर आगारातील चालक एका हाताने बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Updated On: Sep 12, 2018 10:38 AM IST

VIDEO: अहो, ड्रायव्हर साहेब ही 'टारझन कार' नाही, बस आहे!

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावती, 12 सप्टेंबर : राज्य परिवहन विभागाच्या दर्यापूर आगारातील चालक एका हाताने बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दर्यापूर आगाराची बस क्रमांक एम एच २०-बी एफ १९३१ ही शनिवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता दर्यापूर निंभारीमार्गे अंजनगाव सुर्जीसाठी निघाली होती. बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते.

बस दर्यापूर शहर पार करत अकोट दर्यापूर टी-पॉइंटवरून अंजनगाव सुर्जी मार्गावर लागताच बसचालकाने बस वेगाने चालवण्यास सुरुवात केली. रस्त्यात काही आडवे आले तर जोरात ब्रेक दाबणे, मोकळा रस्ता दिसला की भरधाव बस पळवणे, गतिरोधक आला तर वाहन हळू न चालवणे, खड्ड्यात बस आपटणे, त्यामुळे प्रवासी एकमेकांच्या अंगावर तसंच पुढील सिटवर धडकत होते. त्यानंतर लेहेगाव फाटा पार करताच चालक एक पाय समोरील बफरवर ठेवून एकाच पायाने क्लच, ब्रेक, एक्सिलेटर हाताळत होता.

हा अतिशहाणा चालक चक्क एका हाताने स्टेअरिंगसुद्धा सांभाळताना दिसून आला. हा सर्व प्रकार काही प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांच्या अंगावर शहारे येण्यास सुरुवात झाली. चालकाकडे पाहून तो नशेत असल्यासारखा दिसत होता. ही बाब महिला वाहकाच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनीसुद्धा याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अशा बस चालकांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, कारण याने प्रवाशांचा जीव धोक्यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2018 10:31 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close