पुण्यात 'डान्सिंग कार'ची चर्चा; आजींमुळे अश्लील चाळे करणाऱ्यांचे बिंग फुटले!

पुण्यात 'डान्सिंग कार'ची चर्चा; आजींमुळे अश्लील चाळे करणाऱ्यांचे बिंग फुटले!

ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला 'पीके' चित्रपटातील विनोदी प्रसंग नक्कीच आठवले.

  • Share this:

पुणे, 21 जुलै: अभिनेता आमिर खानच्या पीके चित्रपटातील डान्सिंग कार तुम्हाला नक्कीच आठवत असले. अशाच एका डान्सिंग कारची चर्चा सध्या पुन्हा रंगली आहे. होय विश्वास बसणार नाही. एका सोसायटीच्या दरवाज्यात गाडी पार्क करून त्यावर कव्हर टाकून आतमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलाना नागरिकांनी पकडले. विशेष म्हणजे सोसायटीमधील एका आजींमुळे हा प्रकरण उघडकीस आले.

परमहंसनगरमधील मिलेट्री गेटजवळ एका गाडी पार्क करण्यात आली होती. गाडीवर कव्हर देखील टाकले होते. रस्त्याच्या बाजूला कव्हर टाकून पार्क करण्यात आलेल्या या गाडीच्या जवळून जाताना एका आज्जींना गाडीच्या आतून एसी चालू असल्याचा आवाज आला. गाडीवर कव्हर टाकले असताना एसी कसा काय चालू आहे याबद्दल शेजारी राहणाऱ्या आजींना आश्चर्य वाटले.

गाडीत लहान मुले अडकली असण्याची शक्यता वाटल्याने त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना बोलवले. या नागरिकांनी लहान मुले अडकली असतील म्हणून गाडीचे कव्हर काढले. पण त्यांना गाडीत अश्लील चाळे करणारे प्रेमीयुगुल सापडले. गाडीतल्या या प्रकाराबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटले.

प्रेमीयुगुलाचे हा कारनामा उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी जोडप्याला समज देऊन तेथून जाण्यास सांगितले. या घटनेची चर्चा मात्र पुण्यात सुरु झाली आहे.एखाद्या चित्रपटात विनोदीपद्धतीने दाखवण्यात आलेला असा प्रसंग प्रत्यक्षात दिसल्याची चर्चा नागरिक करत होते.

Loading...

नाट्यगृहाची दुरावस्था, भरत जाधवच्या संतापाचा स्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pune
First Published: Jul 21, 2019 08:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...