दोन तासांच्या पावसानं नाशिकची दैना, अनेक वाहनं वाहून गेली

दोन तासांच्या पावसानं नाशिकची दैना, अनेक वाहनं वाहून गेली

दोन तास चाललेल्या या पावसाने शहरातील खोलगट भागात पाणी साचलं, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

  • Share this:

14 जून : दोन तासांच्या मुसळधार पावसाने नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली.दुपारी उन्हाचा चटका बसत असताना 4 वाजता अचानक पावसानं जोरदार हजेरी दिली. दोन तास चाललेल्या या पावसाने शहरातील खोलगट भागात पाणी साचलं, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

नाशिक गंगाघटाजवळ असणाऱ्या सराफ बाजारात तर स्थानिकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यात. सराफ बाजार नाशिकमधील मोठी बाजारपेठ आहे. या परिस्थितीमुळे हा बाजार बंद असून सगळे व्यवहार ठप्प आहेत. अनेक ठिकाणी झाडे उलमडून पडली.

गंगापूर रोड येथील डोंगरेवस्ती गृह ग्राऊंडच्या भागातील इमारतीमध्ये तीन फुटापर्यंत पाणी साचलं. यामुळे येथील दुकानदारांचं मोठं नुकसान झालं आहे. वारंवार येथील नगरसेवकांना सांगून महानगरपालिका नालेसफाई करत नसल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं नागरिकांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2017 09:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...