News18 Lokmat

'साहसी' दहीहंडीला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2018 06:49 PM IST

'साहसी' दहीहंडीला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू

मुंबई, 03 सप्टेंबर : मुंबईत थरांचा थराथराट एका गोविंदाच्या जीवावर बेतला आहे. धारावीतील 20 वर्षांच्या अंकुश खंदारे या गोविंदाचा मृत्यू झालाय. सायन रुग्णालयात अकुशला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.

आज सकाळपासून गोविंदा रे गोपाळाचा गजर करत शेकडो नव्हे तर हजारो पथकं दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर उतरली आहेत. काही पथकांनी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी सलामी दिलीय तर काही पथकांचा प्रयत्न उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरलाय. पण या जीवघेण्या साहसी खेळात जखमी गोविंदाची संख्याही मोठी आहे. सकाळपासून 60 गोविंदा जखमी झाले आहेत. धारावीत एका गोविंदा पथकातील अंकुश खंदारे हा 20 वर्षीय तरुण जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.

सकाळपासून विविध गोविंदा पथकं थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न करताहेत. अशा प्रयत्नांमध्ये आत्तापर्यंत 60 गोविंदा जखमी झालेत. या सर्व गोविंदांवर विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. 20 गोविदांना उपचारानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आलीय. तर 40 गोविंदा विविध हॉस्पिटल्समध्ये भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत उपचार

सायन हॉस्पिटल -2, केईम हॉस्पिटल-4, नायर-7, एस.एल.रहेजा-01, पोद्दार-2, सेंट जॉर्ज हॉस्पिटल-01, एम.टी. अग्रवाल-2,राजावाडी-7, महात्मा फुले, व्ही.एन. देसाई-4, भाभा हॉस्पिटल -5, ट्रॉम केअर-04 (सर्वांची प्रकृती स्थिर)

Loading...

पोलीस आणि प्रशासनाने सर्व गोविंदा पथकांना काळजीपूर्वक खेळण्याचं आवाहन केलंय. थोडी काळजी घेतली तर आनंदावर विरजण पडणार नाही आणि उत्तमपणे खेळही खेळता येईल.

दरम्यान, बोरीवलीमध्ये तारामती चॅरिटेबल ट्रस्टकडून भव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. तिकडे घाटकोपरमध्ये भाजप आमदार राम कदम यांनी सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या दहीहंडीचं आयोजन केलंय. तर ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधवांनी दहा थर लावणाऱ्या पथकाला 21 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. तर ठाण्यातलेच भाजप नेते शिवाजी पाटलांच्या स्वामी प्रतिष्ठाननं 10 थर लावणाऱ्या पथकाला 25 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय.

===================================================================

दादरच्या या दहीहंडीचा थरार तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2018 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...