S M L
Football World Cup 2018

डहाणूमध्ये इमारतीला भीषण आग, सहा जणांना वाचवले

डहाणू तालुक्यात विशाल ट्रेडर्स या मॉल आणि रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली.

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2018 08:43 AM IST

डहाणूमध्ये इमारतीला भीषण आग, सहा जणांना वाचवले

पालघर, 14 मार्च : डहाणू तालुक्यात विशाल ट्रेडर्स या मॉल आणि रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली. या आगीतून सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. तर एक जण अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डहाणू तालुक्यातील कासामधील दुमजली विशाल ट्रेडर्स या मॉल आणि रहिवाशी इमारतीला पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत या आगीतून सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. तर एक जण अडकल्याची शक्यता आहे.  कासाच्या मुख्य बाजारपेठेमध्ये हा मॉल असल्याने दुसऱ्या दुकानांना आगीची झळ पोहचू नये म्हणून काळजी घेतली जातेय.

या दुमजली इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोअरला मॉल आहे तर पहिल्या मजल्यावर गोडाऊन असून मोठ्या प्रमाणात धान्याचा साठा आहे. खाद्यतेल असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळा निर्माण होतोय. अग्निशमन दल आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे.

जवळपास 5 तास उलटूनही आग आटोक्यात नाही. अग्निशमनच्या 4 गाड्या आणि पाण्याचे 3 टँकर दाखल झाले आहे. या आगीत माॅलचं कोट्यवधीचं नुकसान झालंय. मात्र, ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 07:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close