S M L

सर्वाधिक गर्दीच्या दादर स्टेशनचं रूप बदण्यासाठी 'पॅरिस पॅटर्न'

मुंबईतलं दादर रेल्वे स्टेशन अत्यंत गजबजलेलं स्टेशन आहे. पण हे स्टेशन आता कात टाकणार आहे. पॅरिसच्या धर्तिवर याचा मास्टर प्लान रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे.

Updated On: Sep 5, 2018 05:27 PM IST

सर्वाधिक गर्दीच्या दादर स्टेशनचं रूप बदण्यासाठी 'पॅरिस पॅटर्न'

स्वाती लोखंडे- ढोके, प्रतिनिधी, मुंबई, ता. 5 सप्टेंबर : मुंबईतलं दादर रेल्वे स्टेशन अत्यंत गजबजलेलं स्टेशन आहे. पण हे स्टेशन आता कात टाकणार आहे. कोरीयन सरकारबरोबर दादरला नवं रुप देण्याची बोलणीही सुरु असून मास्टर प्लान तयार होतोय. दादर स्टेशन म्हणजे गर्दी..हे समीकरण काही बदलत नाहींये. लोकसंख्ये बरोबर दादरच्या स्टेशनवरची गर्दीही वादाहत चाललीय. दादरचा विकास करायचा तर कसा? कारण लोकलची वाहतूक थांबवू शकत नाही. मग करायच तर काय? वाहतूक ना थांबवता हे शक्य आहे. कसं शक्य आहे? असा प्रश्न निर्माण होतोय. त्याचंही उत्तर पॅरिसच्या प्रयोगात मिळालं आहे.

पॅरीस मधलं ‘ला देल मोंपारनास’ स्टेशन हे अत्यंत गजबजलेलं स्टेशन मानलं जातं. मुंबईतल्या सगळ्या रेल्वे स्टेशनवर जी समस्य होती ती ही इथेही होती. जागेचा अभाव, वाहतूक आणि गर्दी. तरीही वाहतुकीला कोणताही अडथळा न उभारता तिथं आदर्श रेल्वे स्टेशन निर्माण करण्यात आलंय. तोच आदर्श दादरसाठी घेता येणार आहे.

दादर मध्ये राहणाऱ्या काही इंजिनिअर्सनी ने एकत्र येऊन पॅरिससारखा दादर स्टेशन च्या विकासाचा आराखडा तयार केलाय. या आराखड्यानुसार हे स्टेशन 8 मजली असेल. पहिल्या माळ्यावर तिकीट काउंटर आणि खाण्याचे स्टॉल असतील. तर बाकीच्या माळ्यावर रेल्वे कार्यालय, शैक्षणिक संस्था, व्यापारी वापरासाठी दिले जातील, ज्यातुन रेल्वेला मिळकत होईल.प्रवासी फक्त ट्रेन पकडण्यासाठीच प्लॅटफॉर्म वर जातील. दादर पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीला जराही अडथळा न करता हे स्टेशन सुधारलं जाऊ शकत. इथे सिमेंट च्या भिंती ऐवजी लोखंडी फ्रेम वापरल्या जाव्या ज्या बाहेर जोडल्या जातील. आणि वाहतुक बंद असणाऱ्या काळात ट्रेन ने इथे आणले जातील. आणि क्रेन च्या साहाय्याने जोडल्या जातील.

खासदार राहुल शेवळेंनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या समोर हा आराखडा मांडलाय. सध्या याचं स्वरूप प्राथमिक आहे. पण जर 581 कोटींचा हा आराखडा मंजूर झाला तर मात्र, स्टेशन मधील च गर्दी कमी होईल असं नाहीं. तर बाहेरचे फुल विक्रेते आणि ट्रॅफिस जॅम च्या समस्ये वरही उत्तर मिळेल. रेल्वे मंत्री मुंबईच्या समस्येबाबत किती गंभीर आहेत यावरच दादर स्टेशनचा विकास अवलंबून आहे.

VIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2018 05:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close