दाभोलकरांच्या मारेकऱ्याला अटक, हमीद यांची पहिली प्रतिक्रिया

लवकरात लवकर गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश मारेकरी सापडले जातील अशी अपेक्षाही हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2018 10:15 AM IST

दाभोलकरांच्या मारेकऱ्याला अटक, हमीद यांची पहिली प्रतिक्रिया

सातारा, 19 आॅगस्ट : तब्बल पाच वर्षांनंतर डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणी सीबीआयने मारेकरी सचिन अंदुरेला जेरबंद केलंय. दाभोलकरांच्या मारकऱ्याला अटक व्हावी या मागणीसाठी गेल्या पाच वर्षांपासून दाभोलकरांचा मुलगा हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते लढा देत होते. सीबीआयच्या या कारवाईबद्दल हमीद दाभोलकर यांनी समाधान व्यक्त केलंय.

डाॅ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात पहिली अटक करण्यात आली. याआधी विरेंद्र तावडेला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्यानंतर ही दुसरी अटक आहे. सीबीआयची कारवाई स्वागतहार्य आहे. आता सीबीआयने या प्रकरणाची पाळमुळं शोधून काढली पाहिजे अशी अपेक्षा आहे. या प्रकरणी कोर्टाने गेल्या अडीच वर्षात  तपासावर देखरेख ठेवली. आणि अंधश्रद्धा निर्मुल समितीने या प्रकरणी पाठपुरावा केला. त्यामुळे या तपासात ही प्रगती दिसतेय. लवकरात लवकर गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश मारेकरी सापडले जातील अशी अपेक्षाही हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान,डॉ.नरेंद्र दाभोलकरांची गोळी झाडून हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला अखेर जेरबंद करण्यात आलंय. गोळी झाडणाऱ्याला औरंगाबादमधून अटक झालीये. त्यामुळे एटीएस आणि सीबीआयच्या हाताला तब्बल 5 वर्षांनी मोठं यश आलंय. सचिन अंदुरे असं अटकेतील आरोपीचं नाव असून त्यानं हत्येची कबुली दिल्याची माहिती सीबीआयनं दिलीये. नऊ महिन्यांपासून तो औरंगाबादेत राहण्यासाठी आला होता.

कळसकर-अंदुरेने आधीही केला होता दाभोलकरांना मारण्याचा प्रयत्न !

शरद कळसकर यानं डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची रेकी केली होती. तेव्हा कोणत्या वेळेस कुठे जातात? कोणाला भेटतात? कोणत्या वेळेस एकटे असतात? कोणत्या वेळेस त्यांच्या आजूबाजूला कोण नसतं? या सर्वाची रेकी शरद कळसकर यानं केली होती. याच रेकीच्या आधारे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी पहिल्यांदा डाॅक्टर नरेंद्र दाभोलकरांना मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न फसला आणि २० आॅगस्ट २०१३ ला सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी  नरेंद्र दाभोलकर माॅर्निंग वाॅकला जात असताना त्यांच्या दिशेने बाईक चालवत शरद कळसकर आला होता आणि त्याच्या मागे बसला होता तो सचिन अंदुरे... याच सचिन अंदुरे ने नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या आणि पळून गेले.

Loading...

पुढे जाऊन त्यांनी ठरल्या प्रमाणे या हत्येत वापरलेली बाईक, पिस्तूल आणि कपडे हे नष्ट करण्यासाठी दिले की यांनीच ते नष्ट केले याचा तपास आता एटीएस आणि सीबीआय करत आहेत. पण महत्वाचे म्हणजे या हत्येकरता बाईक आणि पिस्तूल पुरवले कुणी? याचा तपास देखील सीबीआय करत असून याआधी अटक केलेल्या विरेंद्र तावडे याने त्याची बाईक पनवेलहून पुण्याला नेली होती ती हीच बाईक आहे का ? जी शरद आणि सचिनने वापरली होती. याबद्दल तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2018 10:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...