पुणे,18 सप्टेंबर: पुण्यातील लोकबिरादरी मित्रमंडळ आणि सावित्रीबार्इ फुले पुणे विद्यपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सायक्लॉथोनचं आयोजन करण्यात आलंय.
'जुनं पुणं , सायकलींचं पुणं' या घोषवाक्याने सायक्लोथॉन घेण्यात आली. 7 किलोमीटर, 12 किलोमीटर, 17 किलोमिटर या प्रकारात सायक्लोथॉन स्पर्धा घेण्यात आली. सर परशुरामभाऊ विद्यालयाच्या आवारात बच्चेकंपनीपासून ज्येष्ठांपर्यंत यात सगळे सहभागी झाले.
पुणं एकेकाळी सायकली आणि टांग्यांसाठी प्रसिद्ध होत. अशी आठवण ज्येष्ठ पुणेकरांनी सांगितली. एकीकडे पुण्याचं प्रदूषण धोक्याच्या पातळीपर्यंत गेलंय. दुसरीकडे वाहनांची संख्या ३५ लाखावर गेली आहे. या परिस्थितीत पुण्याला सायकलींशिवाय पर्याय नाही असं मतही व्यक्त केलं जातं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा