S M L

पिंडीला शिवण्यासाठी पाळले 'रेडीमेड' कावळे

परभणीतल्या एका तरुणानं चक्क कावळेच पाळले आहेत. हैदराबादमधून आणलेले हे चार कावळे पिंडदानाच्या वेळी पिंजऱ्याबाहेर काढले जातात. एरवी मात्र ते पिंजऱ्यात खेळत असतात.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 15, 2017 06:20 PM IST

पिंडीला शिवण्यासाठी पाळले 'रेडीमेड' कावळे

पंकज क्षीरसागर, प्रतिनिधी  

परभणी, 15 ऑक्टोबर: आज कालचा जमाना रेडिमेडचा आहे. या रेडिमेडला जन्मापासून मृत्यूपर्यंतचे कोणतेच विधी अपवाद नाहीत. यासाठीच की काय परभणीतल्या श्याम झंवर यांनी पिंडाला शिवून घेण्यासाठी चक्क कावळे पाळले आहेत.

मृत व्यक्तीच्या पिंडीला कावळा शिवण्याची जुनी पद्धत आपल्याकडे अस्तित्वात आहे. पण आजकाल पिंडीला कावळे जास्त मिळत नाही.म्हणूनच की काय स्मशानात उत्तरकार्याच्यावेळी  पिंडाला शिवण्यासाठी परभणीतल्या एका तरुणानं चक्क कावळेच पाळले आहेत. हैदराबादमधून आणलेले हे चार कावळे पिंडदानाच्या वेळी पिंजऱ्याबाहेर काढले जातात. एरवी मात्र ते पिंजऱ्यात खेळत असतात.पिंडाला कावळा शिवला नाही की मृताच्या नातेवाईकांच्या जिवाची मोठी घालमेल होते. श्यामच्या या युक्तीमुळे किमान त्यांना तरी दिलासा मिळणार आहे.याआधी नाशकातही पिंडाला  शिवण्यासाठी  एका इसमाने कावळाच पकडून आणला होता. अशाप्रकरच्या अनेक घटना सध्या राज्यात घडत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 06:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close