अंगाचा थरकाप उडवणाऱ्या मगरींचा 'तो' व्हिडिओ कुठला ?

अंगाचा थरकाप उडवणारं असं हे दृष्य आहे. कुणी म्हणतं हे महाड येथील सावित्री नदीतील मगरींचा हा व्हिडिओ आहे. पण सत्य काही वेगळंच आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 3, 2018 12:39 AM IST

अंगाचा थरकाप उडवणाऱ्या मगरींचा 'तो' व्हिडिओ कुठला ?

02 मे : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. काही दिवसांपासून एका नदीत भयानक अशा मगरींचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. अंगाचा थरकाप उडवणारं असं हे दृष्य आहे. कुणी म्हणतं हे महाड येथील सावित्री नदीतील मगरींचा हा व्हिडिओ आहे. पण सत्य काही वेगळंच आहे.

एक संथ नदी आणि या नदीवर हेलिकाॅप्टर थोडं पुढे जातं आणि सुरुवातीला एक मगर दिसते. डोळ्याची पापणी लवते ना लवते ती मगर एका पक्षाला गिळते. हेलिकाॅप्टरच्या हवेच्या दबावामुळे नदीवरील हिरवा शेवाळाचा थर दूर सारला जातो आणि मग एक, दोन, चार, दहा आणि वीसहुन अधिक मगरी डोळ्यासमोर येतात. एकमेकांवरून चढत या मगरी पुढे सरकत असतात मग काय एकच कल्लोळ माजतो आणि मग झुंडचं समोर येते...हे दृश्य पाहुन कुणाच्याही अंगाचा थरकाप उडेल.

आता हे दृश्य महाड येथील सावित्री नदीतलं असल्याचं सांगितलं जातंय. सावित्री नदीत मगरी आहे असं नाही. पण एवढ्या मगरी असू शकता का ?, हा प्रश्न पडला. या प्रश्नाचं उत्तरही सोशल मीडियावरच मिळालं. महाडकरांनी हे दृश्य आमच्या इथलं नाही असं पत्रच जाहीर केलंय.

महाडकर म्हणतात,

"आज दुपार पासून काही लोक आपल्या महाड आणि सावित्री नदीचे नाव घेऊन एक व्हिडिओ व्हायरल करत आहेत आणि त्यामुळे आपल्या महाड शहराबद्दल एक भीतिदायक अफवा पसरवली जात आहे तर ती कृपया करून थांबवावी.

Loading...

आपण जो व्हिडिओ महाड शहर आणि सावित्री नदीच्या नावाने शेअर करत आहात तो महाडचा नसून गुजरात येथील विश्वामित्र नदीचा आहे ही नदी मगरींन साठी प्रसिद्ध आहे.

तरी कृपया करून हा व्हिडिओ आपल्या महाडच्या नावानी व्हायरल होत आहे ते थांबवणे आपले काम आहे.

तो विडियो आपल्या महाड शहर आणि सावित्री नदी च्या नावानी पसरवला जात असेल तर ते थांबवावे आणि जे पसरवत असतील त्यांना सांगावे की आधी शहानिशा करून व्हिडिओ पाठवणे."

महाडकरांनी तरी हा दावा फेटाळून लावताय. हा व्हिडिओ महाडकरांच्या म्हणण्यानुसार गुजरातमधील विश्वामित्र नदीचा आहे. असं जरी असलं तरी हा व्हिडिओ तिथलाच आहे का हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2018 12:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...