समुद्राच्या लाटांना भेदून आली महाकाय मगर, दापोलीतील घटना कॅमेऱ्यात कैद

नेहमी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर महाकाय मासे पाहण्यास मिळतात. पण, रत्नागिरीतील दापोली समुद्र किनाऱ्यावर महाकाय मगर आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2017 06:34 PM IST

समुद्राच्या लाटांना भेदून आली महाकाय मगर, दापोलीतील घटना कॅमेऱ्यात कैद

07 आॅक्टोबर : नेहमी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर महाकाय मासे पाहण्यास मिळतात. पण, रत्नागिरीतील दापोली समुद्र किनाऱ्यावर महाकाय मगर आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील लाडघर समुद्र किनाऱ्यावर नेहमी प्रमाणे पर्यटकांची गर्दी होती. पर्यटक सुट्टीचा आनंद लुटत होते. मात्र काही अंतरावर समुद्राच्या लाटांना सारून एक महाकाय मगर समोर येताना पाहुन पर्यटकांना एकच धक्का बसला. मगर समुद्रकिनाऱ्यावर आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अवघ्या काही क्षणात समुद्रकिनारा ओस पडला. मात्र, मगर निवांतपणे समुद्राच्या लाटांचा आनंद लुटत होती.

स्थानिक मच्छिमारांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि त्यानंतर मगरीला जेरबंद करण्याचा थरार सुरू झाला. सुरुवातीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला जेरबंदही केलं. पण, मगरीने जाळी तोडून पुन्हा बाहेर आली. अखेर मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मगरीला जेरबंद करण्यात यश आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2017 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...