बहिणींच्या समोर मगरीने 12 वर्षीय मुलाला ओढून नेलं कृष्णा नदीच्या पाण्यात, शोध सुरु

कृष्णा नदी पात्रातील मगरीने पुन्हा एकदा एका मुलाला लक्ष्य केले आहे. मुलाला नदीत ओढून नेल्याची घटना गुरुवारी घडली. आकाश मारुती जाधव (वय-12, रा. निंबळक, ता.इंडी, जि. विजापूर,) असं मुलाचं नाव आहे. मागील चार तासांपासून मुलाचा शोध घेण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 16, 2019 06:14 PM IST

बहिणींच्या समोर मगरीने 12 वर्षीय मुलाला ओढून नेलं कृष्णा नदीच्या पाण्यात, शोध सुरु

आसिफ मुरसल (प्रतिनिधी)

सांगली, 16 मे- कृष्णा नदी पात्रातील मगरीने पुन्हा एकदा एका मुलाला लक्ष्य केले आहे. मुलाला नदीत ओढून नेल्याची घटना गुरुवारी घडली. आकाश मारुती जाधव (वय-12, रा. निंबळक, ता.इंडी, जि. विजापूर,) असं मुलाचं नाव आहे. मागील चार तासांपासून मुलाचा शोध घेण्यात येत आहे.

सांगली नजीकच्या मौजे डिग्रज गावामध्ये ही घटना घडली आहे. आकाश दुपारी नदीत पोहत होता. नदी काठावर येऊन मगरीने मुलाला पाण्यात ओढून नेले.आकाशचे आई-वडील नदीच्या काठावर विटभट्टीवर काम करतात. चार दिवसांपूर्वीच आकाश शाळेच्या सुट्टीत घरी आला होता. आई-वडील वीट भट्टीवर काम करत होते. आकाश दोन बहिणींसोबत नदीवर अंघोळीसाठी आले होते. या दरम्यान मगरीने आकाशला नदीत ओढून नेले. ही घटना समजताच या मुलांच्या शोध घेण्यास वन विभागाने सुरुवात केली आहे.वनविभागाचे अधिकारी मनोज कोळी व त्यांचे सहकारी नदी पात्रात मागील चार तासांपासून बोटीतून आकाशचा शोध घेत आहेत. शोध पथकाला 10 ते 12 फूट लांबीच्या मगरीचे दर्शन झाले असून मात्र अद्याप मुलगा दिसला नाही.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी औदुंबरमधील नदी पात्रातील मगरीने एका मुलावर हल्ला केला होता. मुलाला मगरीने ओढून नेले होते. एक दिवसांच्या शोध मोहिमेनंतर मुलाचा मूतदेह नदी पात्रात सापडला होता. आता अशीच घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


Loading...

VIDEO : बापरे! उपचार सुरू असताना तोंडातच झाला स्फोट, महिला जागीच ठार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2019 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...