VIDEO तुरुंगातून सुटणारे गुंड काढतात मिरवणुका, पोलिसांचा धाक संपला का?

'एकीकडे या गुन्हेगारांच उदात्तीकरण आणि दुसरीकडे वाहतूक कोंडी हे सहन होण्यापलिकडचं आहे. पोलिसांनी कारवाई करावी.'

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 06:34 PM IST

VIDEO तुरुंगातून सुटणारे गुंड काढतात मिरवणुका, पोलिसांचा धाक संपला का?

वैभव सोनवणे, पुणे 9 जुलै : ऐकेकाळी गुन्हेगारांना समाजाचा आणि पोलिसांचाही धाक होता. मात्र आता या दोनही संस्थांचा धाक राहिला की नाही असा प्रश्न पडण्यासारख्या घटना पुण्यात घडताहेत. तुरुंगातून जामीनावर किंवा इतर कारणांमुळे सुटणारे गुन्हेगार आणि त्यांचे समर्थक चक्क मिरवणूक काढून काहीतरी जिंकल्याच्या थाटात तुरुंगातून घराकडे परतत असल्याचे धक्कादाय प्रकार पुढे आले आहेत. अशा घटना तातडीने बंद केल्या पाहिजेत अशी मागणी नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी केलीय.

येरवडा कारागृहातून सुटणाऱ्या गुन्हेगारांच्या समर्थकांकडून गुन्हेगारी दादांची जेल बाहेरूनच मिरवणुका काढण्याचा नवा पायंडा सध्या जोरात सुरू झालाय. गुन्हे करून कारागृहात जाणाऱ्या तथाकथित भाईंना जामीन मिळाला की त्यांना जेलमधून सुटकेच्या वेळी घ्यायला येणाऱ्या समर्थकांच्या मिरवणुकांनी पुणेकर वैतागले आहेत.

येरवडा कारागृहाच्या बाहेर खडक पोलिस ठाण्यातला मोक्काचा नवनाथ लोधा हा आरोपी सुटला आणि त्याला घ्यायला चारशे ते पाचशे समर्थक आलेत. दुचाकीवरून आलेल्या या समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीने येरवडा कारागृहाचा रस्ता तब्बल तासभर जाम झाला होता. या गुन्हेगाराला घ्यायला आलेल्या समर्थकांनी जोरदार हुल्लडबाजी केली मात्र कारागृहासमोर उभ्या असलेल्या पोलिसांनी बघ्याचीच भूमिका घेतली. ही बाब रोजचीच झाली असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. अशा घटनांमुळे इथे रोज वाहतूक कोंडी ही होत असते. एकीकडे या गुन्हेगारांच उदात्तीकरण आणि दुसरीकडे वाहतूक कोंडी हे पोलीस निमूटपणे पाहतात अशा गुंड आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कारवाई करावी, असे प्रकार बंद करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा विविध संघटनांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2019 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...